आयपीएल 2025 च्या रिटेंन्शननंतर यादी नंतर आता या मेगा टी20 लीगच्या मेगा लिलावाबाबत चित्र स्पष्ट होत आहे. बीसीसीआयने मेगा लिलावासाठी नोंदणी केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. ज्यामध्ये भारत आणि परदेशातील एकूण 1574 खेळाडूंनी नोंदणी केली आहे. यावेळचा मेगा लिलाव खूप खास असणार आहे. ज्यामध्ये काही मोठ्या स्टार्सनीही सहभाग नोंदवले आहेत.
एकीकडे इंग्लंडचा स्टार अष्टपैलू बेन स्टोक्सने आपले नाव नोंदवले नाही. तर दुसरीकडे अनुभवी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने आपले नाव नोंदवले आहे. या वर्षी निवृत्ती घेतलेल्या जेम्स अँडरसनचे नाव सर्वांनाच चकित करत आहे. चला तर मग या बातमीद्वारे जाणून घेऊयात की या दिग्गज खेळाडूला मेगा लिलावात कोणते तीन संघ लक्ष्य करु शकतात.
3. दिल्ली कॅपिटल्स
जागतिक क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट टी20 लीग आयपीएलमध्ये ट्रॉफी जिंकण्याचे दिल्ली कॅपिटल्स संघाचे स्वप्न पूर्ण झालेले नाही. यावेळी त्यांनी कायम ठेवलेल्या खेळाडूंमध्ये कोणत्याही मोठ्या स्टारला स्थान दिलेले नाही. अशा स्थितीत मेगा लिलावात युवा आणि अनुभवी खेळाडूंचा समतोल साधण्याचे आव्हान त्यांच्यासमोर असेल. अशा परिस्थितीत जेम्स अँडरसन हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. जो गोलंदाजीसोबत युवा वेगवान गोलंदाजांसाठी मार्गदर्शकाची भूमिकाही बजावू शकतो.
2. पंजाब किंग्ज
आयपीएलमध्ये आतापर्यंत जेतेपदापासून वंचित राहिलेला पंजाब किंग्स नव्याने संघ तयार करणार आहे. पंजाबने फक्त 2 अनकॅप्ड खेळाडूंना कायम ठेवले आहे. त्यामुळे ते मेगा लिलावात अनेक बड्या खेळाडूंचा समावेश करू इच्छितात. ज्यामध्ये ते इंग्लंडचा माजी दिग्गज गोलंदाज जेम्स अँडरसनवर मोठी बोली लावू शकतात. रिकी पाँटिंग हे संघाचे प्रशिक्षक असून त्यांनी अँडरसनची क्षमता अगदी जवळून पाहिली आहे. अशा स्थितीत पंजाब या इंग्लिश खेळाडूला लक्ष्य करू शकतो.
1.चेन्नई सुपर किंग्ज
आयपीएलच्या इतिहासात, चेन्नई सुपर किंग्स हा अशा संघांपैकी एक आहे. ज्याने अनेकदा अनुभवी आणि जुन्या खेळाडूंवर जुगार खेळला आहे. आता ते जेम्स अँडरसनलाही टार्गेट करू शकतात. चेन्नई फ्रँचायझी इंग्लिश वेगवान गोलंदाज अँडरसनला त्याचा अनुभव लक्षात घेऊन संघात घेऊ इच्छित आहे. अँडरसन या संघासह ड्वेन ब्राव्होची पोकळी देखील भरून काढू शकतो. जो गोलंदाजी प्रशिक्षक होता आणि आता केकेआरमध्ये सामील झाला आहे.
हेही वाचा-
विदेशी भूमीवर विराट कोहलीच्या नेतृत्वात टीम इंडियाची बलाढ्य कामगिरी; पाहा आकडेवारी
चक्क आपल्याच कर्णधाराशी भिडला हा खेळाडू, लाईव्ह सामन्यात ‘तू-तू मैं-मैं’, पाहा VIDEO
IND VS AUS; भारताला मिळाला नवा कसोटी सलामीवीर? रोहितच्या जागी करु शकतो ओपनिंग