इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत बुधवारी (२८ एप्रिल ) झालेल्या सामन्यात धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या चेन्नई सुपर किंग्ज संघाने डेविड वॉर्नरच्या सनरायझर्स हैदराबाद संघाला ७ गडी राखून पराभूत केले. या हंगामात चेन्नई सुपर किंग्ज संघ उल्लेखनीय कामगिरी करत आहे. या संघाने सलग ५ सामने जिंकून पुन्हा एकदा गुणतालिकेत प्रथम स्थान पटकावले आहे. या सामन्यात फाफ डू प्लेसिस सोबत मिळून उल्लेखनीय फलंदाजी करणाऱ्या ऋतुराज गायकवाडचे माजी भारतीय फलंदाजाने तोंडभरून कौतुक केले आहे.
या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघाने प्रथम फलंदाजी करताना १७१ धावा केल्या होत्या. त्यानंतर १७२ धावांचा पाठलाग करताना चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून ऋतुराज गायकवाडने ७५ धावांची खेळी केली होती.
या खेळीचे कौतुक करताना माजी भारतीय फलंदाज वीरेंद्र सेहवाग म्हणाला की, “ऋतुराज घाईघाईत फलंदाजी करत नाही. तो खूप आरामात खेळतो, असंही नाही की तो स्ट्राइक रेटकडे लक्ष देत नाही. तो सामान्य शॉट खेळत धावा करतो. त्याला जेव्हा वाटेल तेव्हा तो बॅकफुटवर किंवा फ्रंटफुटवर जाऊन धावा करू शकतो. याआधी विराट कोहली, असे करत होता आणि अजूनही करत आहे . ऋतुराज जेव्हा स्टेप आऊट करतो तेव्हा तो षटकार मारत नाही. जर चांगला टाईम झाला तर तो षटकार मारतो नाहीतर तो चौकार तरी मारतो. चौकार पण तितकाच महत्वाचा असतो आणि षटकार देखील तितकाच महत्त्वाचा असतो. त्याची फलंदाजी पाहून मला आनंद होतो.”
कर्णधार होऊ शकतो ऋतुराज – सेहवाग
सेहवाग पुढे म्हणाला, “मी ऋतुराज गायकवाडला अजुन भेटलो नाही किंवा त्याला पाहिलं देखील नाही. परंतु, तो असच दोन-तीन वर्ष खेळत राहिला तर तो एमएस धोनीच्या जागेवर पुढे चेन्नई सुपर किंग्ज संघाचा कर्णधार होऊ शकतो. मी त्याच्यासोबत व्यक्तिगतरित्या वेळ घालवला नाही. परंतु, तो आपली जबाबदारी ओळखून खेळतो. आपली विकेट सहज देत नाही. तो खूप नियंत्रणात असतो. असे सर्व पाहून मी हे नक्की सांगू शकतो की, येणारे २-३ वर्षे तो संघात टिकून राहू शकतो. आणखी टिकला तर तो चेन्नई सुपर किंग्ज संघाचा देखील कर्णधार होऊ शकतो.”
चांगल्या चेंडूवर झाला होता बाद
तसेच तो पुढे म्हणाला की, “तो खराब चेंडूवर बाद झाला नाही. तो चांगल्या चेंडूवर बाद झाला होता. अशा चेंडूवर विराट कोहली आणि डिविलयर्स सारखे खेळाडू देखील बाद झाले असते.”
तसेच डू प्लेसिस बद्दल बोलताना सेहवाग म्हणाला,” डू प्लेसिस उत्कृष्ट फलंदाजी करतो. त्याचा टायमिंग अचूक आहे. तसेच त्याच्याकडे भरपूर शॉट्स आहेत. परंतु स्ट्राइक रेटच्या बाबतीत गायकवाडने डू प्लेसिसला मागे टाकले आहे. या भागीदारीत गायकवाड पुढे होता. पुढे जाऊन तो आणखी चांगली फलंदाजी करेल तर गोलंदाज त्याला आणखी घाबरतील.”
महत्त्वाच्या बातम्या –
आख्ख्या आयपीएल इतिहासातील अनोखा योगायोग! एक-दोन नाही, तर सलग ३ सामन्यात झाल्या सारख्याच धावा
राजस्थान संघात ‘हा’ खेळाडू घेणार बेन स्टोक्सची जागा; पाहा कशी आहे टी२० कारकिर्द
मनीष पांडेला कोणी केले होते संघाबाहेर? स्वतः संघ प्रशिक्षकाने केला मोठा खुलासा






