दिल्ली। गुरुवारी (२९ एप्रिल) इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामात २४ वा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात झाला. अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना राजस्थानने २० षटकात ४ बाद १७१ धावा केल्या. त्यामुळे एक खास योगायोग आयपीएलमध्ये पाहायला मिळाला आहे.
गेल्या ३ सामन्यात सारख्याच धावा
राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना १७१ धावा केल्या. त्यामुळे आयपीएल २०२१ हंगामात सलग तिसऱ्यांदा असे झाले की प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने १७१ धावा केल्या असून प्रतिस्पर्धी संघाला १७२ धावांचे आव्हान दिले आहे. यापूर्वी आयपीएल २०२१ हंगामातील २२ व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने अहमदाबादमध्ये दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध खेळताना प्रथम फलंदाजी करताना ५ बाद १७१ धावा केल्या होत्या. हा सामना बेंगलोरने १ धावेने जिंकला होता.
त्यानंतर आयपीएल २०२१ हंगामातील २३ व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध दिल्लीमध्ये खेळताना प्रथम फलंदाजी करत ३ बाद १७१ धावा केल्या होत्या. हा सामना चेन्नईने ७ विकेट्सने जिंकला होता.
आता या सामन्यानंतर २४ व्या आयपीएल २०२१ च्या सामन्यातही प्रथम फलंदाजी करणाऱ्या राजस्थान रॉयल्स संघानेही १७१ धावाच केल्या आहेत. त्यामुळे आयपीएलमध्ये असे पहिल्यांदाच झाले आहे की सगल ३ सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने सारख्याच धावा केल्या आहेत.
राजस्थानच्या फलंदाजांची सांघिक कामगिरी
गुरुवारी, मुंबई इंडियन्सविरुद्ध राजस्थानच्या फलंदाजांकडून सांघिक कामगिरी पाहायला मिळाली. राजस्थानकडून सलामीवीर जोस बटलर आणि यशस्वी जैयस्वालने ६६ धावांची भागीदारी रचली. बटलर ४१ धावांवर तर जयस्वाल ३२ धावा करुन बाद झाले. त्यानंतर संजू सॅमसन आणि शिवम दुबेने ५७ धावांची भागीदारी केली. संजू सॅमसन ४२ धावांवर तर दुबे ३५ धावांवर बाद झाला. अखेर डेव्हिड मिलर आणि रियान परागने राजस्थानला १७१ धावांपर्यंत पोहचवले. मिलर ७ धावांवर आणि पराग ८ धावांवर नाबाद राहिले.
मुंबईकडून राहुल चाहरने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या. तसेच जसप्रीत बुमराह आणि ट्रेंट बोल्टने प्रत्येकी १ विकेट घेतली.
महत्त्वाच्या बातम्या –
राजस्थान संघात ‘हा’ खेळाडू घेणार बेन स्टोक्सची जागा; पाहा कशी आहे टी२० कारकिर्द
मनीष पांडेला कोणी केले होते संघाबाहेर? स्वतः संघ प्रशिक्षकाने केला मोठा खुलासा
राजस्थानची ‘रॉयल’ मदत! कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी केले कोट्यवधी रुपयांचे दान