भारत देश सध्या कोरोना व्हायरसच्या संकटाचा सामना करत आहे. रोज लाखो लोक या कोरोना व्हायरच्या विळख्यात अडकताना दिसत आहेत. त्यातच वैयद्यकिय सुविधांचा तुटवडाही जाणवत आहे. त्यामुळे सध्या भारतातील ही परिस्थिती पाहाता अनेक सेलिब्रेटी तसेच सामाजिक संस्था मदतीसाठी पुढे येत आहे. नुकतेच काही भारतीय आणि परदेशी क्रिकेटपटूही मदतीला पुढे आले आहेत. आता त्यात इंडियन प्रीमीयर लीगमधील संघ राजस्थान रॉयल्सचाही समावेश झाला आहे.
राजस्थान रॉयल्स मदतीसाठी पुढे
आयपीएलमधील सर्वात पहिला विजेता संघ राजस्थान रॉयल्सने गुरुवारी (२९ एप्रिल) कोरोना व्हायरसविरुद्ध लढण्यासाठी ७.५ कोटी रुपयांची मदत करण्याची घोषणा केली आहे. ही माहिती राजस्थानने ट्विटरवरुन दिली आहे.
त्यांनी ट्विटच्या माध्यमातून सांगितले आहे की कोविड-१९ मुळे प्रभावित झालेल्यांसाठी तातडीने मदत देण्यासाठी मालक, खेळाडू आणि व्यवस्थापनाकडून १ मिलियन डॉलर (भारतीय चलनानुसार ७.५ कोटी रुपये) दान करण्याचा निर्णय घेतला आहे. ही मदत राजस्थान फाऊंडेशन आणि ब्रिटिश एशियन ट्रस्टद्वारे केली जाईल.
https://twitter.com/rajasthanroyals/status/1387703407444590593
या क्रिकेटपटूंचीही कोरोनाग्रस्तांसाठी मदत
सध्याची भारतातील परिस्थिती पाहून ऑस्ट्रेलियाचे वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स आणि ब्रट ली यांनीही मदतीचा हात पुढे केला आहे. पॅट कमिन्सने पंतप्रधान मदत निधीला ५० हजार डॉलर्स म्हणजेच जवळपास ३७ लाख रुपये दान केले आहेत. तसेच त्याने आपल्या इतर सहकाऱ्यांना देखील मदत करण्याचे आवाहन केले होते.
याच आवाहनाला प्रतिसाद देत ब्रेट लीने देखील आता भारताला मदत केली आहे. ब्रेट लीने एक बिटकॉईनची मदत भारताला केली आहे. ज्याची भारतीय रुपयात सध्या किंमत तब्बल ४१ लाख १ हजार रुपये इतकी आहे.
तसेच इरफान आणि युसूफ पठाण हे त्यांच्या वडीलांच्या नावाने असलेल्या ‘मेहमूद खान एस पठाण पब्लिश चॅरीटेबल ट्रस्ट’च्या माध्यमातून बडोदामधील गरजवंत कोरोनाग्रस्तांना मोफत अन्न पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. याबरोबर शेल्डन जॅक्सन आणि श्रीवत्स गोस्वामी हे भारतीय क्रिकेटपटूही मदतीसाठी पुढे आले आहेत.
मागीलवर्षी या भारतीय क्रिकेटपटूंनीही केली होती मदत
मागीलवर्षी भारतातील अनेक क्रिकेटपटूंनी कोरोना व्हायरसविरुद्ध लढण्यासाठी मोठी मदत केली होती. यात विराट कोहली, सुरेश रैना, सचिन तेंडुलकर, अजिंक्य रहाणे, सौरव गांगुली, गौतम गंभीर, रोहित शर्मा, अशा अनेक क्रिकेटपटूंचा समावेश आहे. याशिवाय बीसीसीआयने देखील ५१ कोटी रुपये दान केले होते.
महत्त्वाच्या बातम्या –
आयपीएलनंतर जूनपासून भारतातील ‘या’ राज्यात रंगणार टी२० स्पर्धेचा थरार
कोलकाताचा अनुभव की दिल्लीचा दम, कोण ठरणार वरचढ? ‘अशी’ असेल दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
“माझ्या आयुष्यातील सर्वात दुर्मिळ क्षण!” धोनीने सोपा झेल सोडताच चाहत्यांनी दिल्या भन्नाट प्रतिक्रिया






