---Advertisement---

कोलकाताचा अनुभव की दिल्लीचा दम, कोण ठरणार वरचढ? ‘अशी’ असेल दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

On: गुरूवार, एप्रिल 29, 2021 3:53 PM
---Advertisement---

आज कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स या संघांमध्ये आयपीएलचा २५वा सामना खेळवला जाईल. संध्याकाळी ७.३० वाजेपासून हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाईल. दोन्ही संघांचा यंदाच्या हंगामातील हा सातवा सामना असेल. आत्तापर्यंत दिल्लीने ६ सामन्यात ४ सामने जिंकले असून ते ८ गुणांसह पॉईंट्स टेबलमध्ये तिसर्‍या स्थानी आहेत. तर कोलकाताने आत्तापर्यंत ६ सामन्यात २ सामने जिंकले असून ४ गुणांसह ते पॉईंट्स टेबलमध्ये सहाव्या स्थानी आहेत.

मात्र मागील सामन्याबाबत बोलायचे झाल्यास कोलकाताने पंजाब किंग्जला ५ विकेट्सने मात दिली होती. तर दिल्लीला मात्र रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरूद्ध एका धावेने निसटता पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे कोलकाता या सामन्यात विजयी लय कायम राखण्याचा प्रयत्न करेल. तर दिल्लीचा संघ मागील सामन्यातील पराभव विसरून विजय पथावर परतण्याचा प्रयत्न करेल. चला तर जाणून घेऊया, या सामन्यात दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन कशी असेल?

कोलकाता नाईट रायडर्स –
कोलकाताने मागील सामन्यात विजय मिळवल्याने आजच्या सामन्यात त्यांच्या संघात बदल होण्याची शक्यता कमी आहे. मागील सामन्यात संधी दिलेल्या शिवम मावीने गोलंदाजीत चांगली कामगिरी केली होती. तर काही सामन्यात अडखळत असलेली फलंदाजी मागील सामन्यात लयीत परतल्याचे दिसले. त्यामुळे त्यांचा संघ आजच्या सामन्यात कायम राहण्याची शक्यता आहे.

संभाव्य प्लेइंग इलेव्हन – नितीश राणा, शुभमन गिल, राहुल त्रिपाठी, ईओन मॉर्गन (कर्णधार), आंद्रे रसेल, दिनेश कार्तिक, सुनील नरिन, पॅट कमिन्स, शिवम मावी, प्रसिद्ध कृष्णा, वरुण चक्रवर्ती

दिल्ली कॅपिटल्स –
दिल्लीला मागील सामन्यात चांगली कामगिरी करून देखील निसटत्या पराभवाला सामोरे जावे लागले होते. संघासाठी चिंतेची बाब ही फलंदाजीत आहे. सलामीवीरांनी धावा न केल्यास त्यांना मधल्या फळीच्या अपयशाने दुष्परिणाम भोगावे लागत आहेत. त्यामुळे कदाचित तिसर्‍या स्थानावर संघर्ष करत असलेल्या स्टीव्ह जॉब्स स्मिथच्या जागी अजिंक्य रहाणेला संधी देण्याचा विचार दिल्लीचे संघ व्यवस्थापन करू शकते. मात्र उर्वरित संघ कायम राहण्याची शक्यता आहे.

संभाव्य प्लेइंग इलेव्हन – शिखर धवन, पृथ्वी शॉ, स्टीव्ह स्मिथ/अजिंक्य रहाणे, रिषभ पंत (कर्णधार), मार्कस स्टॉयनिस, शिम्रॉन हेटमायर, अक्षर पटेल, अमित मिश्रा, कॅगिसो रबाडा, इशांत शर्मा, आवेश खान

महत्वाच्या बातम्या:

MI vs RR Live : रोहित शर्माने नाणेफेक जिंकून घेतला गोलंदाजी करण्याचा निर्णय, मुंबईने संघात केला हा बदल

माझ्या आयुष्यातील सर्वात दुर्मिळ क्षण! धोनीने सोपा झेल सोडताच चाहत्यांनी दिल्या भन्नाट प्रतिक्रिया

आनंदाची बातमी! धोनीच्या आई-वडिलांची कोरोनाच्या विळख्यातून सुटका, हॉस्पिटलमधून मिळाला डिस्चार्ज

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---