---Advertisement---

लांब केसातील धोनीचा फोटो शेअर करत सीएसकेने जागवल्या ‘या’ दौऱ्याच्या आठवणी

---Advertisement---

सध्या कोरोना व्हायरसच्या संकटामुळे देशभरात लॉकडाऊन आहे. तसेच आयपीएलचा १३ वा मोसमही अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आला आहे. त्यामुळे या दरम्यान आयपीएलमधील अनेक संघ सोशल मीडियाच्या माध्यमातून विविध गोष्टी करत चाहत्यांना व्यस्त ठेवण्याचा प्रयत्न करत आहे.

यामध्ये ते काही जून्या सामन्यांच्या आठणींना उजाळा देताना दिसत आहेत. तसेच आपल्या संघातील खेळाडूंशी व्हिडिओ चॅटमार्फत चर्चा करताना दिसत आहे. पण ३ वेळच्या आयपीएल विजेत्या चेन्नई सुपर किंग्सने गुरुवारी एक खास फोटो शेअर केला आहे आणि जून्या आठवणी जागवल्या आहेत.

सीएसकेने जूलै-ऑगस्ट २००५ च्या श्रीलंकादौऱ्यातील तिरंगी मालिकेेदरम्यानचा भारतीय संघातील काही खेळाडूंचा फोटो शेअर केला आहे. या फोटोत आयपीएलमध्ये सीएसकेकडून खेळलेले एमएस धोनी, हरभजन सिंह, सुरेश रैना, लक्ष्मीपती बालाजी हे खेळाडू दिसत आहे. तसेच त्यांच्यासह वेणुगोपाल राव देखील आहे.

विशेष म्हणजे या फोटोमध्ये एमएस धोनीचे लांब केस आहे. धोनीने जेव्हा २००४ ला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते त्यावेळी त्याचे लांब केस होते. जवळपास २००७-०८ पर्यंत धोनीचे मानेपर्यंत रुळणाऱ्या केसांची स्टाईल कायम होती.

नंतर त्याने त्याचे लांब केस कापले. त्याने आत्तापर्यंत अनेक वेगवेगळ्या हेअरस्टाईल केल्या आहेत. पण तरीही अनेक चाहत्यांना त्याचे लांब केसांची स्टाईल अधिक भावते.

सीएसकेने शेअर केलेल्या या जून्या फोटोला कॅप्शन दिले आहे की ‘मेन इन ब्ल्यू (भारतीय संघ) पिवळ्या रंगाच्या जर्सीत (चेन्नई सुपर किंग्सकडून) खेळण्यास सुरु करण्याच्या आधी. हे अनमोल आहे. अंदाजे २००५, श्रीलंका’

विशेष म्हणजे या तिरंगी मालिकेनंतर दोन महिन्यांनी ऑक्टोबर – नोव्हेंबर २००५ ला श्रीलंकेविरुद्ध झालेल्या वनडे मालिकेतील तिसऱ्या वनडे सामन्यात जयपूर येथे धोनीने त्याच्या वनडे कारकिर्दीतील नाबाद १८३ धावांची सर्वोत्तम खेळी केली होती.

त्यावेळी त्याने १४५ चेंडूत १५ चौकार आणि १० षटकारांसह १८३ धावा केल्या होत्या. या मालिकेत तो सर्वाधिक ३४६ धावाही केल्या होत्या. तसेच तो मालिकावीरही ठरला होता. तसेच त्यावेळीही त्याचे लांब केस होते. 

ट्रेंडिंग घडामोडी – 

क्रिकेट शिकणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, स्टिव्ह स्मिथ देतोय ऑनलाईन क्रिकेट प्रशिक्षण

धोनीच्या काळात खेळलो असलो तरी मी अनलकी नाही – पार्थिव पटेल

धोनीची ती रिऍक्शन पाहून भारताचा वेगवान गोलंदाज जाम घाबरला होता

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---