---Advertisement---

36 वर्षाच्या खेळाडूनं आयपीएलमध्ये पदार्पण करून रचला इतिहास! चेन्नईच्या प्लेइंग 11 मध्ये मिळाली जागा

---Advertisement---

आयपीएल 2024 च्या 49 व्या सामन्यात पंजाब किंग्जनं चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पंजाब किंग्जनं आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. मात्र चेन्नई सुपर किंग्जनं त्यांच्या संघात दोन बदल केले. वेगवान गोलंदाज मथीशा पाथिराना आणि तुषार देशपांडे यांच्या जागी शार्दुल ठाकूर आणि रिचर्ड ग्लीसन यांना संघात स्थान मिळालं आहे.

नाणेफेकीच्या वेळी चेन्नईचा कर्णधार ऋतुराज गायकवाड यानं खुलासा केला की, पाथिराना दुखापतग्रस्त आहे आणि तुषार देशपांडेची प्रकृती ठीक नाही. त्यांच्या जागी स्टार गोलंदाज शार्दुल ठाकूर आणि इंग्लंडचा अनुभवी वेगवान गोलंदाज रिचर्ड ग्लीसन यांचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला. त्याचबरोबर 2014 पासून आयपीएलमध्ये पदार्पण करणारा रिचर्ड ग्लीसन हा दुसरा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला आहे.

इंग्लंडचा अनुभवी वेगवान गोलंदाज रिचर्ड ग्लीसन यानं वयाच्या 36 वर्ष 151 दिवसांनी आयपीएलमध्ये पदार्पण केलं आहे. 2014 नंतर आयपीएलमध्ये पदार्पण करणारा तो दुसरा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला. या बाबतीत झिम्बाब्वेचा दिग्गज खेळाडू सिकंदर रझा पहिल्या स्थानावर आहे. तर चेन्नई सुपर किंग्जचा माजी खेळाडू इम्रान ताहिरचं नाव तिसऱ्या क्रमांकावर येतं.

आयपीएलमध्ये पदार्पण करणारे सर्वात वयस्कर खेळाडू (2014 पासून)
सिकंदर रझा – 36 वर्षे 342 दिवस
रिचर्ड ग्लीसन – 36 वर्षे 151 दिवस
इम्रान ताहिर – 35 वर्षे 44 दिवस
जलज सक्सेना – 34 वर्षे 124 दिवस
केशव महाराज – 34 वर्षे 63 दिवस

दोन्ही संघांच्या प्लेइंग 11

पंजाब किंग्ज – जॉनी बेअरस्टो, सॅम करन (कर्णधार), रिली रोसो, शशांक सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), आशुतोष शर्मा, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, कागिसो रबाडा, राहुल चहर, अर्शदीप सिंग

इम्पॅक्ट प्लेअर्स – प्रभसिमरन सिंग, लियाम लिव्हिंगस्टोन, ऋषी धवन, विद्वत कवेरप्पा, हरप्रीत सिंग भाटिया

चेन्नई सुपर किंग्ज – अजिंक्य रहाणे, ऋतुराज गायकवाड (कर्णधार), डॅरिल मिशेल, मोईन अली, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (यष्टीरक्षक), शार्दुल ठाकूर, दीपक चहर, रिचर्ड ग्लीसन, मुस्तफिजुर रहमान

इम्पॅक्ट प्लेअर्स – समीर रिझवी, मुकेश चौधरी, सिमरजीत सिंग, शेख रशीद, प्रशांत सोळंक

महत्त्वाच्या बातम्या – 

ICC T20 Ranking : सूर्यकुमार यादवचं अव्वल स्थान धोक्यात? बाबर आझमनं घेतली मोठी झेप; यशस्वी टॉप-10 मध्ये दाखल

आयपीएलच्या दोन ‘किंग्ज’ची लढत, पंजाबनं जिंकला टॉस; जाणून घ्या प्लेइंग 11

मयंक यादव पुन्हा जखमी झाल्यानं संतापला ब्रेट ली, लखनऊच्या मॅनेजमेंटला धरलं जबाबदार

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---