मुंबई । चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनीला कर्णधार म्हणून त्याच्या खेळाडूंनी मैदानावर शंभर टक्के योगदान द्यावे, अशी इच्छा असते. मग ती फलंदाजी असो, गोलंदाजी असो की क्षेत्ररक्षण असो. बर्याच वेळा असे घडते की, जर एखाद्या खेळाडूने क्षेत्ररक्षण करताना चूक केली तर तो त्यांना फटकारतो, पण तेही अत्यंत संयम आणि शांततेने. या हंगामातही ते घडले आणि ते ही संघाचा सलामीवीर फलंदाज शेन वॉटसनबाबत.
सीएसकेने आपला दुसरा साखळी सामना राजस्थान रॉयल्सविरुद्ध मंगळवारी खेळला. या सामन्यादरम्यान शेन वॉटसन ‘फील्डिंग पोजिशन’ पासून एकदा दूर गेला. या सामन्यानंतर शेन वॉटसनने आपल्या व्हिडिओ ब्लॉगमध्ये म्हटले आहे की, ‘क्षेत्ररक्षण करताना आपण चूक केली होती, त्यानंतर एमएस धोनीने त्याची आठवण करून दिली की फील्डिंग पोजिशन कशी चुकीची होती.”
शेन वॉटसन म्हणाला की, “एका चेंडू दरम्यान मी शॉर्ट थर्ड मॅनच्या जागेपासून काहीसे दूर उभा होता. सॅम करनचा हा चेंडू माझ्याजवळून निघून गेला. यानंतर धोनीने सांगितले की माझी ‘फिल्डिंग पोझिशन’ पहिल्यासारखी नव्हती.”
या माजी ऑस्ट्रेलियन खेळाडूने पुढे सांगितले की, “एमएस मैदानावरील सर्व खेळाडूंची जबाबदारी निश्चित करतो. होय, मला वाईट वाटत होते, परंतु मी पुन्हा या अशी चूक करणार नाही, याची खात्री करुन घेईन.” शारजाहत झालेल्या या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जला 16 धावांनी पराभव पत्करावा लागला होता. राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना 7 बाद 216 धावा केल्या होत्या, त्यानंतर चेन्नई सुपर किंग्ज संघ 6 बाद 200 धावा करू शकला. सीएसकेला आता आपला पुढील सामना शुक्रवारी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध खेळायचा आहे.