---Advertisement---

रैना-रायुडूचा नवा अवतार! सीएसकेच्या खेळाडूंना खाऊ घातली बिर्याणी, पाहा व्हिडिओ

On: सोमवार, एप्रिल 12, 2021 7:54 PM
---Advertisement---

एमएस धोनीच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्सच्या आयपीएल २०२१ हंगामाची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. रिषभ पंतच्या नेतृत्वातील दिल्ली कॅपिटल्सने चेन्नईला पहिल्या सामन्यात ७ गडी राखून पराभूत केले. मात्र, हा पराभव विसरून संघाने १६ एप्रिल रोजी पंजाब किंग्स विरुद्धच्या दुसर्‍या सामन्यासाठी तयारी सुरू केली आहे.

दरम्यान, खेळाडूही फावल्या वेळेचा आनंद लुटत आहेत. याचा एक व्हिडिओ चेन्नई सुपर किंग्सने आपल्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केला आहे. यात खेळाडू स्वयंपाकघरातच जेवण बनवत, एकमेकांसमवेत बसून मजाही घेत आहेत.

सीएसकेने शेअर केला व्हिडिओ
सीएसकेने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून खेळाडूंचा एक मजेदार व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात सुरेश रैना आणि अंबाती रायुडू स्वयंपाकघरात बिर्याणी बनवताना दिसत आहेत. या दोघांनीही शेफसारखा पेहराव केला आहे. दोघेही बिर्याणीसाठी मसाले तयार करून स्वयंपाकाच्या कामात व्यस्त आहेत.

रैनाला पाहून असे वाटते की, त्याला स्वयंपाक करायला आवडते. बिर्याणी व्यवस्थित शिजलेली आहे की नाही हे तपासण्याचे काम रायुडू करत आहे. या दोघांव्यतिरिक्त संघातील आणखी बरेच खेळाडू स्वयंपाकघरात दिसतायेत. बर्‍याच प्रयत्नांनंतर रैना आणि रायुडूची बिर्याणी तयार झाली.

त्यानंतर संघाचे प्रशिक्षक, कर्मचारी आणि सहकारी खेळाडू हॉटेलमध्ये या जेवणाचा आनंद लुटताना दिसले. व्हिडिओच्या सुरूवातीला स्टीफन फ्लेमिंग, माइक हसी आणि शार्दुल ठाकूर हॉटेल स्विमिंग पूलच्या बाजूला न्याहारी करताना दिसत आहेत. या दरम्यान बर्‍याच खेळाडूंचे कुटूंबही त्यांच्यासोबत बसलेले दिसतेय. मात्र, अडीच मिनिटांच्या या व्हिडिओमध्ये चेन्नईचा कर्णधार धोनी आणि त्याचे कुटुंब कोठेही दिसले नाही.

पहिल्या सामन्यात चेन्नईला पत्करावा लागला पराभव
आयपीएल २०२१ च्या पहिल्या सामन्यात चेन्नईला दिल्लीने पराभूत केले. या सामन्यात सुरेश रैनाने सर्वाधिक ५४ धावा केल्या. त्याच्याशिवाय मोईन अलीने ३६ धावांची खेळी केली होती. मात्र, कर्णधार धोनीला खातेही उघडता आले नाही. दिल्लीचा वेगवान गोलंदाज आवेश खानने त्याला त्रिफळाचित केले. आयपीएलच्या इतिहासात चौथ्यांदा तो बाद झाला.

महत्त्वाच्या बातम्या –

आयपीएल २०२१: पहिल्या तीन सामन्यांत ‘हे’ ३ खेळाडू ठरले हुकूमी एक्के, ज्यांनी बदलला सामन्याचा रंग

कोरोनातून बरा झालेला ‘हा’ क्रिकेटपटू बेंगलोरकडून धावांचा पाऊस पाडण्यास सज्ज, म्हणतोय, ‘कोरोना होणे माझ्यासाठी…’

मुंबई इंडियन्ससाठी आनंदाची बातमी, ‘हा’ दिग्गज कोलकाताविरुद्धच्या सामन्यात खेळणार

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---