---Advertisement---

झिंगाटच! मराठमोळा ऋतुराज गायकवाड आयपीएल २०२१ साठी करतोय जोरदार तयारी, पाहा व्हिडिओ

On: शुक्रवार, मार्च 19, 2021 5:35 PM
---Advertisement---

इंडियन प्रीमीयर लीगचा १४ वा हंगाम काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. येत्या ९ एप्रिलपासून या हंगामाला सुरुवात होईल. त्यामुळे मोजकेच दिवस शिल्लक असल्याने आयपीएलमध्ये सहभागी होणाऱ्या संघांनी तयारीला सुरुवात केली आहे. तीन वेळच्या विजेत्या चेन्नई सुपर किंग्सने तर चेन्नईत सराव शिबिरही आयोजित केले आहे. या शिबिरादरम्यानचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. नुकताच मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडचाही असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

सध्या चेन्नई सुपर किंग्स संघाचे सराव शिबिर चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर सुरु आहे. या शिबिरासाठी कर्णधार एमएस धोनीसह ऋतुराज गायकवाड, आर साई किशोर, अंबाती रायडू, केएम असिफ, एन जगदिसन असे काही चेन्नई संघातील खेळाडू उपस्थित आहेत. त्यांचा यंदाच्या हंगामासाठी कसुन सरावही सुरु आहे.

याच सरावादरम्यानचा ऋतुराजचा एक व्हिडिओ चेन्नई सुपर किंग्सच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओची खास गोष्ट म्हणजे या व्हिडिच्या बॅकग्राऊंडला ‘झिंगाट’ हे मराठी गाणे वाजत आहे. त्यामुळे अनेक मराठी चाहत्यांना हा व्हिडिओ भावला आहे. या व्हिडिओवर अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत.

तसेच या व्हिडिओला कॅप्शन दिले आहे की ‘ऋतुराजला आम्ही त्याच्या भाषेत सेलिब्रेट करत आहोत.’ याबरोबरच या कॅप्शनमध्ये मराठी भाषेत लिहिण्यात आले आहे की ‘आमचा दिवस झिंगाट बनवलास’.

या व्हिडिओमध्ये ऋतुराज संघसहकाऱ्यांबरोबर हसून मजा-मस्ती करताना तसेच नेटमध्ये फलंदाजीचा सराव करता दिसत आहे. दरम्यान तो काही मोठे फटकेही मारताना दिसत आहे.

https://www.instagram.com/p/CMjnG-DjAHr/

ऋतुराजची चेन्नईकडून शानदार कामगिरी –

ऋतुराज गेल्या ३ हंगामापासून चेन्नई संघाचा भाग आहे. त्याने गेल्या हंगामातून आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. त्याच्यासाठी मागील हंगामाची सुरुवात खास झाली नव्हती. मात्र त्याने हंगामाचा शेवट अफलातून कामगिरी करत गोड केला.

ऋतुराज मागील आयपीएल हंगामाच्या सुरुवातीच्या काही दिवसातच दोनवेळा कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने त्याला अन्य खेळाडूंपेक्षा अधिक काळ क्वारंटाईनमध्ये रहावे लागले होते. ज्यामुळे तो आयपीएल स्पर्धा सुरु झाल्यानंतर संघाशी जोडला गेला होता. तसेच त्याची सुरुवातीची कामगिरीही विशेष झाली नाही.

पण नंतर त्याने जबरदस्त पुनरागमन केले. त्याने चेन्नईकडून शेवटच्या तीन सामन्यात अर्धशतकी खेळी केली. त्यामुळे तो आयपीएलमध्ये सलग ३ अर्धशतके करणारा चेन्नईचा पहिला खेळाडू ठरला. त्याने चेन्नईकडून ६ सामने खेळताना ५१ च्या सरासरीने २०४ धावा केल्या. त्याच्या कामगिरीनंतर चेन्नईचा कर्णधार एमएस धोनी तसेच फाफ डू प्लेसिसनेही कौतुक केले होते.

चेन्नईची आयपीएल २०२१ ची सुरुवात मुंबईतून

मागील हंगामात खास कामगिरी करता न आलेल्या चेन्नई संघाला यंदा चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल. त्यांचे पहिले ५ सामने मुंबईत होणार आहेत. तर त्यानंतर चेन्नई साखळी फेरीतील पुढील सामने दिल्ली, बंगळुरु आणि कोलकाता येथे खेळणार आहे. चेन्नईचा पहिला सामना १० एप्रिलला दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध होणार आहे.

असे आहेत आयपीएल २०२१ मधील चेन्नई सुपर किंग्सचे साखळी फेरीतील सामने-

१० एप्रिल – चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, मुंबई, संध्याकाळी ७.३० वाजता
१६ एप्रिल – पंजाब किंग्ज विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, मुंबई, संध्याकाळी ७.३० वाजता
१९ एप्रिल – चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स, मुंबई, संध्याकाळी ७.३० वाजता
२१ एप्रिल – कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, मुंबई, संध्याकाळी ७.३० वाजता
२५ एप्रिल – चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, मुंबई, दुपारी ३.३०
२८ एप्रिल – चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, दिल्ली, संध्याकाळी ७.३० वाजता
१ मे – मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, दिल्ली, संध्याकाळी ७.३० वाजता
५ मे – राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, दिल्ली, संध्याकाळी ७.३० वाजता
७ मे – सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, दिल्ली, संध्याकाळी ७.३० वाजता
९ मे – चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध पंजाब किंग्ज, बंगळुरू, दुपारी ३.३० वाजता
१२ मे – चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स, बेंगलोर, संध्याकाळी ७.३० वाजता
१६ मे – चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्स, बंगळुरू, संध्याकाळी ७.३० वाजता
२१ मे- दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, कोलकाता, संध्याकाळी ७.३० वाजता
२३ मे – रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, कोलकाता, संध्याकाळी ७.३० वाजता

महत्त्वाच्या बातम्या –

व्हिडिओ : ‘या’ खास कारणासाठी ख्रिस गेलने मानले पंतप्रधान मोदींचे आभार

“देशाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी बोलावणे येते तेव्हा…”, टीम इंडियात संधी मिळाल्यानंतर प्रसिद्ध कृष्णाची प्रतिक्रिया

बाबर आझमच्या अडचणीत वाढ, ‘या’ प्रकरणी न्यायालयाने एफआयआर दाखल करण्याचे दिले आदेश

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---