मंगळवारी (दि. 23 मे) इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेचा पहिला क्वालिफायर सामना चेन्नई सुपर किंग्स वि. गुजरात टायटन्स संघात खेळला गेला. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडिअमवर झालेल्या या सामन्यात चेन्नईने जबरदस्त सांघिक कामगिरी करत 15 धावांनी विजय मिळवला. यासह त्यांनी अंतिम फेरीत प्रवेश केला. यानंतर संघाचा कर्णधार एमएस धोनी याला तो पुढील वर्षी पुन्हा एकदा चेन्नईत खेळताना दिसणार का? असा प्रश्न विचारला गेला त्यावर त्याने अगदी स्पष्ट उत्तर दिले.
चेन्नईच्या विजयानंतर पारितोषिक वितरण समारंभात हर्षा भोगले यांनी धोनीशी संवाद साधला. सामन्या विषयीच्या गोष्टी बोलल्यानंतर पुन्हा एकदा चेन्नईत खेळताना दिसणार का असा प्रश्न त्यांनी विचारला. त्यावर उत्तर देताना तो म्हणाला,
“मी आत्ता फारसे काही सांगू शकत नाही. कारण, विचार करण्यासाठी माझ्याकडे आठ नऊ महिन्यांचा मोठा कालावधी आहे. पुढील हंगामासाठी मिनी ऑक्शन असेल. त्यावरही काही अवलंबून असेल. जानेवारीपासून मी बाहेर आहे. मात्र मी कोणत्या ना कोणत्या भूमिकेत सीएसकेसाठी असेल.”
धोनीने आयपीएल 2023 च्या चेन्नईमधील अखेरच्या साखळी सामन्यानंतर प्रेक्षकांना मर्चंटडाईज वाटप केले होते. आता क्वालिफायर सामन्यानंतर चेन्नई अहमदाबाद येथे अंतिम सामना खेळेल. त्यामुळे यावर्षी चेन्नईचा संघ चेन्नईत खेळताना दिसणार नाही.
धोनी हा आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून चेन्नईचा भाग आहे. त्याच्या नेतृत्वात चेन्नईने चार वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले असून तब्बल दहाव्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. यावर्षी धोनी अखेरच्या वेळी आयपीएल खेळत असल्याचे म्हटले जात होते. त्यामुळे तो गेलेल्या प्रत्येक ठिकाणी चाहते चेन्नई सुपर किंग्स व धोनीला जोरदार पाठिंबा मिळत होता.
(CSK Skipper MS Dhoni Big Statement On His Retirement In IPL)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘खरा मित्र सुखासोबतच दुःखातही…’, सिडनीतील सभेत नरेंद्र मोदींनी काढली शेन वॉर्नची आठवण
पहिल्या Qualifierमध्ये चमकली ऋतुराज-कॉनवेची जोडी, 87 धावांच्या भागीदारीने घडवला इतिहास, वाचाच