इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात गुजरात टायटन्स संघाचा पराभव करत चेन्नई सुपर किंग्स संघाने विजय मिळवला. यासोबतच पाचव्यांदा आयपीएलची ट्रॉफी आपल्या नावावर करण्याचा खास मानही मिळवला. यापूर्वी महेंद्र सिंग धोनी कधीच कोणतीही ट्रॉफी जिंकल्यानंतर इतका भावूक झालेला दिसला, जितका तो आयपीएलच्या 16व्या हंगामाचा किताब जिंकल्यानंतर भावूक झाला. दुसरीकडे, धोनीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधत आहे. हा व्हिडिओ पाहून प्रत्येकजण भावूक झाल्याशिवाय राहणार नाही. अंतिम सामन्याला दोन दिवस उलटले, तरीही हा व्हिडिओ व्हायरल जोरदार होत आहे.
एमएस धोनी (MS Dhoni) याने आयपीएल 2023 (IPL 2023) स्पर्धेत दुखापतीसह खेळला, हे सर्वांनाच ठाऊक आहे. धोनीच्या डाव्या पायाच्या गुडघ्याला दुखापत झाली होती आणि तो अनेकदा मैदानावरही वेदनेत दिसला होता. इतकेच नाही, तर अंतिम सामन्यात फलंदाजी करण्यासाठी उतरला, तेव्हाही त्याने आधी पायावर पट्टी बांधली होती. व्हायरल व्हिडिओत ड्रेसिंग रूममध्ये धोनी एकटाच गुडघ्याला पट्टी बांधताना दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून चाहतेही भावूक झाले आहेत.
MS Dhoni came to bat even with this injured knee????
His commitment towards the game???? pic.twitter.com/9AL8BQGvf5
— ♚ (@balltamperrer) May 31, 2023
धोनी शून्यावर बाद
हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याच्या गुजरात टायटन्सविरुद्ध फलंदाजीला उतरल्यानंतर धोनी पहिल्याच चेंडूवर झेलबाद झाला. धोनी तंबूत परतताना खूपच निराश झाला होता. कारण, त्याला माहिती होते की, तो ज्या कामासाठी मैदानावर आला होता, ते त्याला पूर्ण करता आले नव्हते. मात्र, धोनीचा हुकमी एक्का रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) याने धोनीचे अपूर्ण काम पूर्ण करत चेन्नईला विजयी केले.
गुजरात टायटन्सचा पराभव
गुजरात टायटन्स संघ अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजीला उतरला होता. या सामन्यात त्यांनी निर्धारित 20 षटकात 4 विकेट्स गमावत 214 धावा केल्या होत्या. मात्र, पावसाच्या व्यत्ययाने सामना बराच वेळ थांबवण्यात आला. त्यामुळे डकवर्थ लुईस नियम वापरण्यात आला आणि चेन्नईला विजयासाठी 15 षटकात 171 धावांचे आव्हान मिळाले. हे आव्हान चेन्नईकडून अखेरच्या षटकातील अखेरच्या चेंडूवर जडेजाने चौकार मारत पूर्ण केले आणि संघाला चॅम्पियन बनवले. (csk skipper ms dhoni seen putting strap on injured left knee before coming out to bat in ipl 2023 final unseen see video)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
WTC फायनलपूर्वीच कांगारुंना वाटतेय विराट-पुजाराची भीती! चेतावणी देत पाँटिंग म्हणाला, ‘लवकर विकेट…’
‘त्याला स्वत:ला सिद्ध करावंच लागेल…’, टीम इंडियातील रहाणेच्या पुनरागमनावर भारतीय दिग्गजाची प्रतिक्रिया