---Advertisement---

भर लाॅकडाऊनमध्ये सीएसके आरसीबीकडून पराभूत…

---Advertisement---

कोराना व्हायरसचा धोका लक्षात घेता भारतात लॉकडाऊनचा तिसरा टप्पा सुरु झाला आहे. पण या दरम्यान काही राज्यांमधील दारु विक्री करणारी दुकाने तसेच आणखी काही दुकानांवरील निर्बंध हटवून नियम शिथिल करण्यात आले आहेत. असे असताना तमिळनाडू सरकारने अजून चेन्नईमधील दारुची विक्री करणारी दुकाने न उघडण्याचा निर्णय घेतला आहे.

पण याचवेळी कर्नाटकमध्ये मोठ्या प्रमाणात दारू विक्री झाली. राज्य सरकारने याबद्दल सांगितले की कर्नाटकमध्ये पहिल्याच दिवशी ४५ कोटींच्या मद्याची विक्री झाली. त्यामुळे बंगळुरु आणि चेन्नई यांच्यात दारु विक्री संदर्भात काही जणांनी मजेशीर टिप्पणी केली. काहींनी यावर गमतीने प्रतिक्रीया दिल्या.

त्यामुळे यात चेन्नई सुपर किंग्सनेही उडी घेतली आणि बंगळुरु शहराशी निगडीत असणारी फ्रँचायझी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला गमतीने ट्रोल केले आहे. त्याचबरोबर दारु विक्रीतील पराभव चेन्नईने आनंदाने मान्य केला आहे.

चेन्नईने ट्विट केले की ‘सध्या चेन्नई बेंगलोरबरोबर स्पर्धा करत असल्याची बरीच चर्चा आहे. यावेळी ही स्पर्धा दारू विक्रीसंदर्भात आहे. नुकत्याच झालेल्या घोषणेनंतर आम्हाला आनंद आहे की सामना सुरु होण्याआधीच आम्ही सामना पराभूत झालो आहोत. कारण सध्या जगातील लढाई जास्त महत्त्वाची आहे.’

या ट्विटवर अनेक चाहत्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.

आयपीएलमध्ये जेव्हाही चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ आमने-सामने येतात तेव्हा त्यांच्यात तीव्र स्पर्धा पहायला मिळते. तसेच त्यांच्यातील सामनाही चाहते मोठ्या उत्साहाने पहात असतात. पण सध्या कोरोना व्हायरसमुळेे आयपीएल २०२० चा मोसम अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आला आहे.

ट्रेंडिंग घडामोडी –

भारतीय गोलंदाज मागायचे आमची माफी, आम्ही करायचो चांगली धुलाई

विराटचं काय घेऊन बसलाय! आता ‘हे’ खेळाडूही झालेत शाकाहारी

जेव्हा राहुल द्रविडच्या घरात शिरली होती अनोळखी मुलगी, घराच्या बाहेर जायला दिला होता नकार

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---