fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

विराटचं काय घेऊन बसलाय! आता ‘हे’ खेळाडूही झालेत शाकाहारी

Virat Kohli Sunil Chhetri Serena Williams lewis Hamilton Venus Williams Vegan Player Vegan diet Health Benefits Eating Vegan

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आपल्या फीटनेसची पूर्ण काळजी घेतो. त्याला बिर्याणी खूप आवडते. परंतु विराटने आपल्या फीटनेससाठी स्वत:ला शाकाहारी बनवले आहे. एका मुलाखतीत विराटने सांगितले की, तो जवळपास गेली काही वर्ष मांसाहारी प्रोटीनपासून दूर राहिला आहे.

तसेच याचा चांगला प्रभाव त्याच्या खेळादरम्यानही दिसला होता. विराटचा (Virat Kohli) सध्याच्या आहारात प्रोटीन शेक, भाज्या आणि सोयाचा समावेश आहे. 

विराटबरोबर जगभरात असे अनेक खेळाडू आहेत ज्यांनी स्वत:ला शाकाहारी बनवले आहे. याच खेळाडूंबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

विराटव्यतिरिक्त शाकाहारी खेळाडूंच्या यादीत अव्वल क्रमांकावर अमेरिकेची स्टार टेनिसपटू सेरेना विलियम्सचे (Serena Williams) नाव आहे. सेरेनाने स्वत:ला २०१४मध्येच शाकाहारी बनवून घेतले होते. ती स्वत:ला अधिक फीट ठेवते. तिचा असा विश्वास आहे की, शाकाहारी राहिल्यामुळे शरीर शुद्ध राहील. सेरेनाची बहीण आणि स्टार टेनिसपटू व्हिनस विलियम्सदेखील (Venus Williams) शाकाहारी (Vegetarian) आहे. व्हिनसने श्वासासंबंधी आजारातून बरे झाल्यानंतर मांसाहार सोडण्याचा निर्णय घेतला होता.

यानंतर भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्रीसुद्धा (Sunil Chhetri) शाकाहारी आहे. त्याने एका मुलाखतीत सांगितले होते की, “मी २०१३मध्ये फुटबॉल क्लब स्पोर्टिंग लिस्बनबरोबर झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान शाकाहारी राहण्याबाबत जागरूक झालो होतो.” ३५ वर्षीय सुनील आता जे काही खातो त्याबद्दल जागरूक राहतो. तसेच त्याला असे वाटते की, कोणालाही आपल्या शरीराबद्दल माहित असले पाहिजे.

सुनीलव्यतिरिक्त जगातील अव्वल फॉर्म्यूला वन रेसर लुईस हॅमिल्टनदेखील (Lewis Hamilton) शाकाहारी आहे. तो २०१७मध्ये शाकाहारी बनला होता. तसेच तो जनावरांच्या हत्येविरुद्धच्या अभियानालाही पाठिंबा देतो.

आरोग्य तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, “शाकाहारी राहण्याचा एक फायदा आहे. तो म्हणजे, यामुळे केवळ तुमच्या शरीरातील रक्ताभिसरण व्यवस्थित होते. तसेच तुमच्या शरीरातील रक्तवाहिन्या आणि धमन्यादेखील शुद्ध होतात. यामुळे हृदयासंबंधित समस्यांच्या धोका कमी करण्यास मदत होते. शाकाहारी लोकांमध्ये अधिक ऊर्जा असते.”

साधारणत: वनस्पतींमध्ये प्रोटीन आणि व्हिटॅमिन बी१२ यांसारखे पोषक तत्वे असतात. यांचा वापर खेळाडू आपल्या आहारात करतात.

ट्रेंडिंग घडामोडी-

-वनडे क्रिकेटमधील ५ सुपर हिरो, जे टी२०मध्ये ठरले झिरो

-क्रिकेटसाठी त्याने अलिशान घर, महागडी गाडीसह सर्व विकले, आता आली अशी वेळ..

-जेव्हा राहुल द्रविडच्या घरात शिरली होती अनोळखी मुलगी, घराच्या बाहेर जायला दिला होता नकार

You might also like