आयपीएल २०२२ साठी दोन नवीन संघांची घोषणा करण्यात आली आहे. दुबईत झालेल्या दोन नवीन संघांच्या बोलीने बीसीसीआयची तिजोरी पूर्णपणे भरली. सोमवारी (२५ ऑक्टोबर) अहमदाबाद आणि लखनौ हे दोन नवीन संघ सीव्हीसी कॅपिटल आणि प्रसिद्ध उद्योगपती संजीव गोयंका यांच्या आरपीएसजीने विकत घेतले. आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठी बोली लावत आरपीएसजीने लखनौ फ्रँचायझी ७,०९० कोटी रुपयांच्या विक्रमी किंमतीला विकत घेतली. त्याचवेळी, अहमदाबाद फ्रँचायझीसाठी सीव्हीसी कॅपिटलने ५,६२५ कोटी रुपयांची बोली लावली.
सीव्हीसी कॅपिटल या स्पॅनिश फुटबॉल लीग ला लीगामध्ये भागभांडवल असलेल्या कंपनीने प्रथमच आयपीएलमध्ये प्रवेश केला. मात्र, संजीव गोयंका यांचा आरपीएसजी ग्रुप आयपीएलमध्ये परतला आहे. चेन्नई सुपर किंग्सवर दोन वर्षांची बंदी असताना संजीव गोएंका यांनी रायझिंग पुणे सुपरजायंट संघ विकत घेतला होता. याच संघाने धोनीला कर्णधारपदावरून हटवून स्टीव्ह स्मिथकडे नेतृत्व सोपवले होते.
रायझिंग पुणे सुपरजायंट २०१६ मध्ये प्लेऑफसाठी पात्र ठरू शकला नव्हता. पुण्याच्या संघाला १४ पैकी केवळ ५ सामने जिंकता आलेले. त्यानंतर पुढच्या हंगामात या संघाचे नेतृत्व करणाऱ्या एमएस धोनीला कर्णधारपदावरून हटवून स्टीव्ह स्मिथकडे कमान सोपवण्यात आली. संघाने चांगली कामगिरी करत अंतिम फेरी गाठली. मात्र, अंतिम फेरीत मुंबई इंडियन्सने पुण्याच्या विजयाच्या आशा भंग केल्या.
आता पुन्हा एकदा आरपीएसजीने आयपीएलमध्ये लखनौ संघ विकत घेतला आहे. मात्र, आयपीएल २०२२ मध्ये पुण्याला चेन्नई सुपर किंग्सशीही सामना करावा लागू शकतो. चेन्नई सुपर किंग्स आणि धोनीचे चाहते त्याला कर्णधारपदावरून हटवल्याचे अजूनही विसरले नाहीत. त्यामुळे आता आयपीएलच्या आगामी हंगामात चेन्नई विरुद्ध लखनौ अशी नवी भिडत पाहायला मिळण्यास आश्चर्य वाटायला नको.
महत्त्वाच्या बातम्या-
अफगानी फलंदाजाचा हुबेहूब धोनी स्टाईल हेलिकॉप्टर शॉट, इंग्लंडची महिला क्रिकेटरही चकित- व्हिडिओ