चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स हे आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ आहेत. यामुळेच या दोन संघांमध्ये होणाऱ्या लढतीला एल क्लासिको म्हटले जाते. आयपीएल २०२२ मध्ये गुरुवारी (२१ एप्रिल) पहिल्यांदाच उभय संघांमध्ये सामना रंगणार आहे. मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियमवर हा सामना होणार असून हा चालू हंगामातील ३३ वा सामना असेल. मुंबई आणि चेन्नई संघाला या हंगामात विशेष कामगिरी करता आलेली नाही. हे दोन्हीही संघ विजयासाठी झगडत आहेत. अशात या सामन्यावर क्रिकेटप्रेमींच्या नजरा असतील.
दरम्यान या सामन्यात चेन्नईकडून (Chennai Super Kings) अष्टपैलू ड्वेन ब्रावो (Dwyane Bravo) शानदार खेळ दाखवू शकतो. तो सध्या चांगल्या लयीत आहे. तसेच मुंबईविरुद्ध (Mumbai Indians) त्याचे आकडेही उल्लेखनीय आहेत. त्यामुळे ब्रावो मुंबईविरुद्ध गेमचेंजर खेळाडू (Bravo Gamechanger Against Mumbai) ठरू शकतो.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
ब्रावोच्या मुंबईविरुद्धच्या प्रदर्शनावर नजर टाकायची झाल्यास, त्याने आतापर्यंत मुंबईच्या ३१ विकेट्स घेतल्या आहेत. ही कोणत्या गोलंदाजाने एका संघाविरुद्ध केलेली तिसरी सर्वश्रेष्ठ गोलंदाजी कामगिरी आहे. त्यातही मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma), कायरन पोलार्ड आणि इशान किशन यांनी तर नेहमीच ब्रावोपुढे गुडघे टेकले आहेत.
चेन्नईचे प्रतिनिधित्त्व करताना ब्रावोने मुंबईचा धाकड फलंदाज कायरन पोलार्डला सर्वाधिकवेळा बाद केले आहे. त्याने पोलार्डची १० वेळा विकेट घेतली आहे. तसेच मुंबईचा कर्णधार आणि सलामीवीर रोहित शर्माही ५ वेळा त्याची शिकार ठरला आहे. याखेरीज इशान किशन आणि सूर्यकुमार यादव या धाकड मुंबईकर फलंदाजांनाही त्याने तंबूत धाडले आहे. अशात पुन्हा एकदा ब्रावो मुंबईच्या फलंदाजांना अडचणीत टाकू शकतो.
ड्वेन ब्रावोची मुंबईविरुद्ध गोलंदाजी कामगिरी-
कायरन पोलार्ड- १६३ चेंडू, २५९ धावा, १० विकेट्स
रोहित शर्मा- ७२ चेंडू, ८२ धावा, ५ विकेट
इशान किशन- १६ चेंडू, २२ धावा, १ विकेट
सूर्यकुमार यादव- ३० चेंडू, ४७ धावा, १ विकेट
फॅबियन ऍलन- ८ चेंडू, २१ धावा, ० विकेट
ब्रावोच्या आयपीएल २०२२मधील कामगिरीवर नजर टाकायची झाल्यास, त्याने आतापर्यंत चेन्नईकडून सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत. ६ सामने खेळताना २१.४ षटके टाकत त्याने १० विकेट्स घेतल्या आहेत. यादरम्यान त्याची सर्वोत्तम कामगिरी २० धावांवर ३ विकेट्स ही राहिली आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
कोरोना संकटानंतरही विजय मिळवल्यावर पंतची लक्षवेधी प्रतिक्रिया, तर मयंकनेही सांगितले पराभवाचे कारण
पाँटिंगचा ‘हा’ गुरुमंत्र आला कामी, दिल्लीने पंजाबला केलं चारीमुंड्या चीत
आयपीएल इतिहासात ‘ही’ अवघड कामगिरी करणारा दिल्ली पहिलाच संघ, पंजाबविरुद्ध केलाय पराक्रम