एमएस धोनी याच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्ज संघ आयपीएलमध्ये सर्वात यशस्वी ठरला. पण इंडियन प्रीमियर लीग 2024 मध्ये धोनी सीएसकेचा कर्णधार नाहीये. गुरुवारी (21 मार्च) ऋतुराज गायकवाड याला सीएसकेचा नवा कर्णधार म्हणून घोषित केले गेले. शुक्रवारी धोनी ऋतुराजच्या नेतृत्वात आयपीएल हंगामातील पहिला सामना खेळला. याच सामन्यात 42 वर्षीय धोनीने यष्टीमागून अशी स्टंपिंग केली, ज्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
आयपीएल 2024चा पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात खेळला गेला. चेन्नईतील चॅपक स्टेडियमवर सीएसकेला नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम गोलंदाजी करावी लागली. प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने 6 विकेट्सच्या नुकसानावर 173 धावा केल्या. शेवटच्या षटकांमध्ये दिनेश कार्तिक आणि अनुज रावत यांनी धावा केल्यामुळे आरसीला ही धावसंख्या गाठता आली. कार्तिकने 38*, तर रावतने 48 धावा केल्या. डावातील शेवटच्या चेंडूवर धोनीने यष्टीपाठी जबरदस्त चपळाई दाखवली आणि रावत धावबाद झाला. 42 वर्षी धोनीची ही स्टंपिंग सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे.
THE DHONI MAGIC AT THE AGE OF 42. 🔥🤯pic.twitter.com/yRRzcqzMmi
— Johns. (@CricCrazyJohns) March 22, 2024
(CSK vs RCB. Dhoni again showed his magic behind the wicket, the crucial batsman was run out on the last ball)
चेन्नई सुपर किंग्स प्लेइंग 11 :- ऋतुराज गायकवाड (कर्णधार), रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, अजिंक्य रहाणे,समीर रिझवी, एमएस धोनी (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, तुषार देशपांडे, दीपक चहर, महेश तीक्ष्णा, मुस्तफिजुर रहमान.
रॉयल चॅलेंजर बंगळुरू प्लेइंग 11 :- फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरोन ग्रीन, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), मयंक डागर, अल्झारी जोसेफ, मोहम्मद सिराज, कर्ण शर्मा.
महत्वाच्या बातम्या –
IPL 2024 । धोनी आता खऱ्या अर्थाने बनला महान विकेटकिपर! कुमार संगकाराला टाकले मागे
मुस्तफिजुरच्या 4 विकेट्सनंतर आरसीबीची 173 धावांपर्यंत मजल, शेवटच्या षटकांमध्ये रावत-कार्तिकच्या धावांचा पाऊस