आयपीएलच्या 13 व्या हंगामातील 29 वा सामना मंगळवारी (13 ऑक्टोबर) दुबई येथे सनरायझर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात होईल. गुणतालिकेत हैदराबाद संघ पाचव्या स्थानावर आहे तर सीएसके सातव्या स्थानावर आहे. अशा परिस्थितीत दोन्ही संघांना हा सामना जिंकून गुणतालिकेत आपले स्थान मजबूत करायचे आहे. या हंगामात आतापर्यंत हैदराबादने 7 पैकी 3 सामने जिंकले आहेत आणि 4 गमावले आहेत. दुसरीकडे चेन्नईने 7 पैकी केवळ 2 सामने जिंकले आहेत.
हैदराबादविरुद्ध चेन्नईने आतापर्यंत खेळलेल्या 13 सामन्यांपैकी 9 सामने जिंकले आहेत. दोन्ही संघांनी मागील सामन्यात पराभवाचा सामना केला होता.
चेन्नईतर्फे डू प्लेसिसने केल्या सर्वाधिक धावा
चेन्नईच्या फलंदाजीबद्दल बोलायचे झाले, तर फक्त सलामीवीर फाफ डू प्लेसिस फॉर्ममध्ये आहे. हंगामात खेळलेल्या 7 सामन्यात त्याने 307 धावा केल्या आहेत. यात 3 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याने किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध नाबाद 87 धावा केल्या होत्या. याव्यतिरिक्त सलामीवीर शेन वॉटसनने आतापर्यंत 199 धावा केल्या आहेत.
चेन्नईतर्फे शार्दुल आणि करनने घेतल्या सर्वाधिक विकेट
गोलंदाजीत सॅम करण आणि शार्दुल ठाकूर यांनी शानदार गोलंदाजी केली. हंगामात वेगवान गोलंदाज करनने 7 सामन्यांत 8 बळी घेतले आहेत तर शार्दुलने 4 सामन्यांत 7 बळी घेतले आहेत. याखेरीज वेगवान गोलंदाज दीपक चहरने 7 सामन्यात 6 बळी घेतले आहेत.
हैदराबादकडून वॉर्नर-बेयरस्टोने केल्या सर्वाधिक धावा
हैदराबादकडून कर्णधार डेविड वॉर्नर आणि सलामीवीर जॉनी बेयरस्टो हे सर्वाधिक धावा करणारे फलंदाज आहेत. वॉर्नरने 7 सामन्यात 2 अर्धशतकांसह 275 धावा केल्या आहेत आणि बेयरस्टोने 7 सामन्यात 3 अर्धशतकांसह 257 धावा केल्या आहेत. याशिवाय लीगमध्ये युवा फलंदाज मनीष पांडेने आतापर्यंत 202 धावा केल्या आहेत.
हैदराबादचा फिरकीपटू राशिद खान पर्पल कॅपच्या स्पर्धेत
लीगमध्ये सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत हैदराबादचा फिरकीपटू राशिद खान चौथ्या क्रमांकावर आहे. हंगामात रशिदने आतापर्यंत 7 सामन्यांमध्ये 10 बळी घेतले आहेत. त्याचबरोबर वेगवान गोलंदाज टी नटराजनने हंगामात आतापर्यंत 7 बळी घेतले आहेत.
दोन्ही संघांचे महागडे खेळाडू
कर्णधार धोनी हा सीएसकेचा सर्वात महागडा खेळाडू आहे. त्याला हंगामात 15 कोटी रुपये मिळतात. त्यांच्यानंतर संघात रवींद्र जडेजाचा क्रमांक लागतो. त्याला एका हंगामात 7 कोटी रुपये मिळतात. हैदराबादचा सर्वात महागडा खेळाडू डेविड वॉर्नर आहे. हंगामात त्याला 12.50 कोटी रुपये मिळतात. यानंतर मनीष पांडेचा क्रमांक लागतो. त्याला हंगामात 11 कोटी रुपये मिळतात.
खेळपट्टी आणि हवामान अहवाल
दुबईतील सामन्यादरम्यान आकाश स्वच्छ होईल. तापमान 23 ते 37 डिग्री सेल्सिअस राहील. खेळपट्टी फलंदाजांना मदत करू शकते. येथे खेळपट्टी संथ गतीची असल्याने फिरकीपटूंनाही खूप मदत होईल. नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम फलंदाजीला प्राधान्य देईल. या आयपीएलपूर्वी खेळलेल्या 61 टी20 सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाचा विजय मिळवण्याचा दर 55.74% होता.
या मैदानावर खेळले गेलेले एकूण टी20 सामने : 61
प्रथम फलंदाजी करताना मिळालेले विजय : 34
प्रथम गोलंदाजी करताना मिळालेले विजय: 26
पहिल्या डावात सरासरी धावसंख्या: 144
दुसर्या डावात सरासरी धावसंख्या: 122
चेन्नई 3 वेळा आणि हैदराबादने 2 वेळा जिंकला खिताब
कर्णधार एमएस धोनीच्या नेतृत्वात चेन्नईने 2010 आणि 2011 मध्ये सलग दोनदा जेतेपद पटकावले. मागच्या वेळी 2018 मध्ये हा संघ चॅम्पियन बनला होता. चेन्नई पाच वेळा (2008, 2012, 2013, 2015 आणि 2019) आयपीएलचा अंतिम सामना खेळला आहे. दुसरीकडे हैदराबादने 2 वेळा (2009 (डेक्कन चार्जर्स हैदराबाद) आणि 2016) जेतेपद पटकावले आहे.
आयपीएलमध्ये हैदराबादपेक्षा चेन्नईचा विजय मिळवण्याचा दर आहे जास्त
चेन्नईने स्पर्धेमध्ये आतापर्यंत 172 सामने खेळले असून यामध्ये या संघांचे 102 विजय आणि 67 पराभव आहेत. 1 सामना अनिर्णीत होता. त्याचबरोबर सनरायझर्सने आतापर्यंत 115 सामन्यांपैकी 61 सामने जिंकले आहेत आणि 54 गमावले आहेत. या लीगमधील सीएसकेचा विजय मिळवण्याचा दर 59.99% आहे आणि हैदराबादचा विजय मिळवण्याचा दर 53.04% आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-चेन्नईला ‘या’ तीन चुका भोवल्या, हैदराबादविरुद्ध झाला पराभव
-चेन्नई-हैदराबाद सामन्यात होऊ शकतात मोठे बदल, ‘या’ खेळाडूंना मिळू शकते प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान
-गेम आहे मिलीमीटर! फक्त काही इंचांनी हुकला मॅक्सवेलचा षटकार नाहीतर…
ट्रेंडिंग लेख-
-आयपीएल २०२०: बेंगलोरने कोलकाताविरुद्ध मिळवलेल्या विजयानंतर अशी आहे गुणतालिका
-विरोधी संघ खुश..! आयपीएल २०२०मध्ये बिघडला या ३ स्टार खेळाडूंचा फॉर्म
-‘मिड सीजन ट्रान्सफर’चा फायदा घेत चेन्नई ‘या’ ३ खेळाडूंना घेणार का आपल्या संघात?