---Advertisement---

सीएसके संघ ऑगस्ट महिन्यात करणार आयपीएलच्या तयारीला सुरुवात, ‘या’ शहरात लावणार कॅम्प

On: मंगळवार, जुलै 20, 2021 6:01 PM
---Advertisement---

जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) चौदावा हंगाम स्पर्धेच्या मध्यात स्थगित करण्यात आला होता. कोरोनामुळे बनविण्यात आलेल्या आयपीएलच्या बायो-बबलमध्ये अचानकपणे खेळाडू व काही कर्मचाऱ्यांचे कोरोना अहवाल सकारात्मक आढळलेले. त्यामुळे ही स्पर्धा २९ सामन्यांनंतर स्थगित करण्यात आलेली‌.

भारतातील कोरोना रुग्णांच्या संख्येत घट न झाल्याने भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) व आयपीएल गव्हर्निंग कौन्सिल यांनी उर्वरित आयपीएल संयुक्त अरब अमिराती(युएई)  येथे खेळविण्याचा निर्णय घेतला आहे. आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या टप्प्याच्या तारखांची घोषणा झाल्यानंतर आता संघ तयारीला लागले असून, भारताचा दिग्गज कर्णधार एमएस धोनीच्या नेतृत्वातील तीन वेळचा विजेता चेन्नई सुपर किंग्स संघ पुढील महिन्यात सराव शिबिर आयोजित करू शकतो.

या ठिकाणी होऊ शकते आयोजन
आयपीएल २०२१ चे उर्वरित ३१ सामने १९ सप्टेंबरपासून युएई येथे आयोजित करण्याचे नक्की झाले आहे. त्याच अनुषंगाने तयारी म्हणून चेन्नई संघ ऑगस्ट महिन्यात चेन्नई येथील चेपॉक स्टेडियमवर सराव शिबिर आयोजित करू शकते. आयपीएल २०२० पूर्वीदेखील चेन्नईने याच मैदानावर सराव शिबिर आयोजित केलेले. भारतामध्ये आयपीएल आयोजित होत असताना हे चेन्नई संघाचे घरचे मैदान आहे.

चेन्नईचे शानदार पुनरागमन
तीन वेळा आयपीएल विजेता राहिलेल्या चेन्नईला युएई येथेच झालेल्या आयपीएल २०२० मध्ये अपयशाचा सामना करावा लागलेला. ते आठ संघाच्या गुणतालिकेत सातव्या स्थानी राहिलेले. मात्र, आयपीएल २०२१ मध्ये त्यांनी शानदार पुनरागमन करत पहिल्या ७ पैकी ५ सामन्यात विजय मिळवून दिल्ली कॅपिटल्सपाठोपाठ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहेत.

चेन्नई सुपर किंग्स संघ-
एमएस धोनी (कर्णधार), सुरेश रैना, रविंद्र जडेजा, ऋतुराज गायकवाड, फाफ डू प्लेसिस, दीपक चाहर, शार्दुल ठाकूर, के गौतम, मोईन अली, सॅम करन, ड्वेन ब्राव्हो, लुंगी एन्गिडी, अंबाती रायुडू, चेतेश्वर पुजारा, भगत वर्मा, साई किशोर, इम्रान ताहीर, रॉबीन उथप्पा, हरी निशांत, हरीशंकर रेड्डी, मिचेल सॅन्टनर, केएम आसिफ, जोस हेझलवूड, कर्ण शर्मा व एन जगदीशन.

महत्त्वाच्या बातम्या – 

इंग्लंड दौऱ्यातील सराव सामन्यात दंडाला काळी पट्टी बांधून मैदानात उतरला भारतीय संघ, ‘हे’ आहे कारण

अटक केलीय राज कुंद्राला, सोशल मीडियावर ट्रोल होतोय अजिंक्य रहाणे, पाहा काय आहे नक्की प्रकरण

तब्बल १४४ किमी दर ताशी वेगाच्या चेंडूवर बटलरचा खणखणीत षटकार, पाहा Video

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---