आयपीएलच्या कालच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने सनरायझर्स हैद्राबादचा ७ विकेट्सने पराभव केला. दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर हा सामना खेळवला गेला. या सामन्यात हैद्राबादने प्रथम फलंदाजी करतांना ३ बाद १७१ धावांचे लक्ष्य उभारले होते. चेन्नईने हे लक्ष्य १८.३ षटकांतच गाठत सफाईदार विजय मिळविला.
चेन्नईचा हा यंदाच्या हंगामातील पाचवा विजय ठरला. या विजयासह त्यांनी पॉईंट्स टेबल मध्ये अग्रस्थान काबीज केले. तर हैद्राबादला पराभव पत्करावा लागल्याने त्यांचे तळाचे स्थान कायम राहिले आहे. या निमित्ताने आपण पॉईंट्स टेबल मधील सगळया संघांची स्थिती जाणून घेऊया –
आयपीएल पॉईंट्स टेबल –
आयपीएल मध्ये सध्या मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स वगळता सगळया संघांचे ६ सामने झाले आहेत. मुंबई आणि राजस्थान यांचे प्रत्येकी ५ सामने झाले आहेत. यात चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांनी सर्वाधिक म्हणजे ६ सामन्यात ५ विजय मिळवत प्रत्येकी १० गुण प्राप्त केले आहेत. मात्र सरस नेट रनरेट मुळे चेन्नईने अव्वल स्थान गाठले आहे. तर रॉयल चॅलेंजर्स बंगलोर दुसर्या स्थानावर विराजमान आहेत.
दिल्ली कॅपिटल्सचा संघ या पॉईंट्स टेबल मध्ये तिसर्या क्रमांकावर आहे. त्यांनी ६ सामन्यात ४ विजय मिळवून ८ गुण प्राप्त केले आहेत. दिल्ली नंतर मुंबई इंडियन्स चौथ्या स्थानावर असून त्यांचे ५ सामन्यातील २ विजयाने ४ गुण झाले आहेत. कोलकाता नाईट रायडर्स, पंजाब किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स या तिन्ही संघांचे देखील २ विजयांसह ४ गुण आहेत. मात्र सरस नेट रनरेटच्या जोरावर कोलकाता पाचव्या आणि पंजाब सहाव्या स्थानावर विराजमान आहेत. तर राजस्थानला सातव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले आहे. सनरायझर्स हैद्राबादचा संघ या पॉईंट्स टेबल मध्ये सगळ्यात तळाला आहे. त्यांना ६ सामन्यात केवळ एक विजय मिळवता आल्याने त्यांचे अवघे २ गुण आहेत.
संघांची क्रमवारी –
१) चेन्नई सुपर किंग्ज – ६ सामने – १० गुण
२) रॉयल चॅलेंजर्स बंगलोर – ६ सामने – १० गुण
३) दिल्ली कॅपिटल्स – ६ सामने – ८ गुण
४) मुंबई इंडियन्स – ५ सामने – ४ गुण
५) कोलकाता नाईट रायडर्स – ६ सामने – ४ गुण
६) पंजाब किंग्ज – ६ सामने – ४ गुण
७) राजस्थान रॉयल्स – ५ सामने – ४ गुण
८) सनरायझर्स हैद्राबाद – ६ सामने – २ गुण
महत्वाच्या बातम्या:
गोष्ट एका क्रिकेटरची भाग १३: तब्बल १८ वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा आशिष नेहरा
IPL2021: चेन्नईने सलग पाचवा विजय मिळवताच सोशल मीडियावर पडला मीम्सचा पाऊस, पाहा काही खास प्रतिक्रिया
लाजवाब! फाफ डू प्लेसिसने हवेत उडी मारत घेतला नेत्रदीपक झेल, पाहा व्हिडिओ






