---Advertisement---

मालिकावीर ठरलेल्या आर अश्विनकडे पत्नीची खास मागणी; म्हणाली, ‘बायोबबल तोड आणि…’

On: रविवार, मार्च 7, 2021 5:02 PM
---Advertisement---

नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियममध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील चौथा कसोटी सामना पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने इंग्लंड संघावर एक डाव आणि २५ धावांनी विजय मिळवला. या विजयाचा शिल्पकार ठरला तो आर अश्विन. त्याने आपल्या उत्कृष्ट फलंदाजीने आणि गोलंदाजीने इंग्लंड संघातील खेळाडूंच्या नाकीनऊ आणून ठेवले होते. अशातच मालिकावीर ठरलेल्या अश्विनच्या पत्नीने ट्विट करत अश्विनला विशेष मागणी केले आहे.

अश्विनने आपल्या अष्टपैलू कामगिरीने भारतीय संघाच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली आहे. अशातच गेल्या काही महिन्यांपासून सतत क्रिकेट खेळत असल्यामुळे अश्विनला बायो बबलमध्ये राहावे लागत आहे. त्यामुळे मालिकावीर ठरलेल्या अश्विनची पत्नी प्रीतीने एक विशेष मागणी करणारे ट्विट केले आहे. त्यामध्ये तिने अश्विनचा मालिकावीर पुरस्कार स्वीकारतानाचा फोटो पोस्ट केलाय आणि त्या खाली तिने हार्टचा इमोजी टाकत लिहले आहे की,” आता बस बायो बबल तोडून घरी ये.”

https://twitter.com/prithinarayanan/status/1368152774005850115

अश्विनने या मालिकेत फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये महत्वाची भूमिका बजावली आहे. त्याने गोलंदाजी करताना सर्वाधिक ३२ गडी बाद केले आहेत. तर मालिकेत भारतीय संघाकडून सर्वाधिक धावा करणारा तो तिसरा फलंदाज ठरला आहे. मालिकेत रिषभ पंत आणि रोहित शर्मा हे सर्वाधिक धावा करणारे फलंदाज ठरले. अश्विनने खेळलेल्या ६ डावात १८९ धावा केल्या आहेत. तसेच रोहित आणि रिषभ नंतर शतक झळकावणारा अश्विन तिसरा फलंदाज आहे.

या मालिकेदरम्यान आर अश्विन कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद ४०० गडी बाद करणारा दुसरा गोलंदाज ठरला. अश्विनने ७७ सामन्यात ४०० गडी बाद करण्याचा पराक्रम केला आहे. या यादीत अव्वल क्रमांकावर मुथैया मुरलीधरनने आहे. त्याने ७२ कसोटी सामन्यात ४०० गडी बाद केले होते.

महत्त्वाच्या बातम्या –

“हेच भारताला जिंकायला १० धावा असताना झाले असते तर…”, वॉशिंग्टनचे शतक हुकल्यावर वडिलांची संतप्त प्रतिक्रिया

INDvsENG: ‘त्याने’ माझ्यात आत्मविश्वास भरला, म्हणून मी शतक झळकावले; आर अश्विनचे वक्तव्य

वर्ल्ड टेस्ट चँपियनशिपची फायनल होणार साउदम्प्टनच्या मैदानावर? ‘या’ कारणामुळे लॉर्डस गमावणार यजमानपद

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---