---Advertisement---

विश्वचषक २०१९: आज होणाऱ्या न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका सामन्याचा असा आहे इतिहास

On: शनिवार, जून 1, 2019 1:28 PM
---Advertisement---

कार्डीफ। आज(1 जून) आयसीसी 2019 विश्वचषकातील तिसरा सामना न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका संघात पार पडणार आहे. हा सामना कार्डीफ येथील सोफिया गार्डन मैदानावर खेळवला जाणार असून या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 3 वाजता सुरुवात होईल.

श्रीलंका आणि न्यूझीलंड संघाची ही आहे खास आकडेवारी – 

#वनडे विश्वचषकात श्रीलंका आणि न्यूझीलंड हे संघ आत्तापर्यंत 10 वेळा आमने-सामने आले आहेत. यामध्ये 6 वेळा श्रीलंकेने आणि 4 वेळा न्यूझीलंडने विजय मिळवला आहे.

#या दोन संघात विश्वचषकात झालेल्या 10 सामन्यांमध्ये आत्तापर्यंत 5 शतके झाली आहेत. यात न्यूझीलंडकडून स्कॉट स्टायरिसने 2 शतके केली असून श्रीलंकेकडून सनथ जयसुर्या, कुमार संगकारा आणि माहेला जयवर्धने यांनी प्रत्येकी 1 शतक केले आहे.

#हे दोन संघ इंग्लंडमध्ये विश्वचषकात आत्तापर्यंत 3 वेळा आमने सामने आले असून श्रीलंकेने 1 वेळा तर न्यूझीलंडने 2 वेळा विजय मिळवला आहे.

#त्याचबरोबर इंग्लंडमध्ये हे दोन संघ वनडे क्रिकेटमध्ये आजपर्यंत 4 वेळा आमने – सामने आले असून 3 वेळा न्यूझीलंडने बाजी मारली आहे. तर 1 वेळा श्रीलंंकाने विजय मिळवला आहे.

#श्रीलंकेने इंग्लंडमध्ये आत्तापर्यंत 55 वनडे सामने खेळले आहेत. त्यातील 21 सामन्यात विजय तर 32 सामन्यात पराभव पाहिले आहेत. तसेच 1 सामना बरोबरीत आणि 1 सामना अनिर्णित सुटला आहे.

#न्यूझीलंडने आत्तापर्यंत इंग्लंडमध्ये 58 वनडे सामने खेळले असून त्यातील 25 सामन्यात विजय आणि 26 सामन्यात पराभव स्विकारला आहे. तसेच 7 सामने अनिर्णित राहिले आहेत.

#वनडे क्रिकेटमध्ये श्रीलंकेने आत्तापर्यंत 837 वनडे सामने खेळले आहेत. त्यातील 380 सामन्यात विजय मिळवले आहेत आणि 415 सामन्यात पराभव पत्करले आहेत. तसेच 5 सामने बरोबरीत तर 37 सामने अनिर्णित राहिले आहेत.

#त्याचबरोबर न्यूझीलंडने आत्तापर्यंत वनडे क्रिकेटमध्ये 758 सामने खेळले असून 342 सामन्यात विजय आणि 370 सामन्यात पराभव स्विकारले आहेत. तर 6 सामने बरोबरीत आणि 40 सामने अनिर्णित सुटले आहेत.

#शेवटचे 5 वनडे सामने –

न्यूझीलंड – विजय, विजय, विजय, पराभव, विजय

श्रीलंका – पराभव, पराभव, पराभव, पराभव, विजय

#विश्वचषकात श्रीलंका विरुद्ध न्यूझीलंड संघात झालेल्या सामन्यांमध्ये –

सर्वाधिक धावा –

न्यूझीलंड – स्कॉट स्टायरिस (352 धावा, 5 सामने),

श्रीलंका – कुमार संगकारा (304 धावा, 6 सामने)

सर्वाधिक विकेट –

न्यूझीलंड – टिम साऊथी (8 विकेट्स, 3 सामने)

श्रीलंका – मुथय्या मुरलीधरन (15विकेट्स, 5 सामने)

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडीबातम्यासदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या – 

विश्वचषक २०१९: विंडीज विरुद्ध पाकिस्तान सामन्यात झालेले ५ विक्रम

विश्वचषक २०१९: पहिल्या सामन्याआधी ऑस्ट्रेलियासाठी ही आहे आनंदाची बातमी

तुफानी फॉर्ममध्ये असणाऱ्या ख्रिस गेलचा झाला या दिग्गजांच्या यादीत समावेश

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment