तब्बल 48 सामने, 45 दिवस, 10 देश आणि 10 क्रिकेट मैदानांवर आतापर्यंतचा सर्वोत्कृष्ट वनडे विश्वचषक 2023 खेळला जाणार आहे. गुरुवारपासून (दि. 05 ऑक्टोबर) या स्पर्धेचा घाट घातला जात आहे. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर उद्घाटनाच्या सामन्यासाठी सज्ज झाले आहे. याच मैदानावर 2019 विश्वचषक विजेत्या इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड संघात स्पर्धेचा पहिला सामना खेळला जाणार आहे. या सामन्याविषयी सर्व माहिती आपण जाणून घेऊयात…
या सामन्यात उतरण्यापूर्वी इंग्लंड आणि न्यूझीलंड (ENG vs NZ) दोन्ही संघांना मोठमोठे धक्के बसले आहेत. ते असे की, न्यूझीलंड संघाचा नियमित कर्णधार केन विलियम्सन (Kane Williamson) आणि टीम साऊदी पूर्णपणे फिट नाहीयेत. त्यामुळे हे दोघेही दिग्गज खेळाडू या सामन्यात खेळताना दिसणार नाहीत. तसेच, इंग्लंड संघाचा स्टार अष्टपैलू बेन स्टोक्स याच्या खेळण्यावरही प्रश्नचिन्ह आहेत. इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर (Jos Buttler) याने स्पर्धेच्या एक दिवसापूर्वी झालेल्या कर्णधारांच्या संमेलनात बेन स्टोक्स (Ben Stokes) याच्या दुखापतीविषयी माहिती दिली.
आमने-सामने आकडेवारी
इंग्लंड आणि न्यूझीलंड संघात आतापर्यंत एकूण 95 वनडे सामने खेळले गेले आहेत. यातील दोन्ही संघांनी प्रत्येकी 44 सामने जिंकले आहेत. तसेच, 3 सामने बरोबरीत सुटले, तर 4 सामन्यांचा निकाल लागला नाही. वनडे क्रिकेट प्रकारात दोन्ही संघांची आकडेवारी एकसारखी आहे. तसेच, विश्वचषकात दोन्ही संघ आतापर्यंत 10 वेळा एकमेकांशी भिडले आहेत. त्यात इंग्लंड 4 वेळा, तर न्यूझीलंड 5 वेळा जिंकला आहे. एक सामना बरोबरीत सुटला होता.
हवामानाची माहिती
रिपोर्ट्सनुसार, अहमदाबाद येथील वातावरण खूपच उष्ण असणार आहे. तसेच, सामन्यादरम्यान खेळपट्टी कोरडी राहण्याची शक्यता आहे. मात्र, सायंकाळी फ्लडलाईट्समुळे वेगवान गोलंदाजांना मदत मिळू शकते.
सामन्याचे थेट प्रक्षेपण
भारतीय प्रमाणवेळेनुसार या सामन्याला दुपारी 2 वाजता सुरुवात होईल. तसेच, उभय संघातील नाणेफेक 1.30 वाजता होणार आहे. हा सामना स्टार स्पोर्ट्सवर पाहता येईल. तसेच, सामन्याची लाईव्ह स्ट्रीमिंग डिझ्नी प्लस हॉटस्टार ऍपवर होईल.
विश्वचषक 2023 स्पर्धेसाठी उभय संघ
इंग्लंड-
जोस बटलर (कर्णधार), मोईन अली, गस एटकिन्सन, जॉनी बेअरस्टो, हॅरी ब्रूक, सॅम करन, लियाम लिव्हिंगस्टोन, डेविड मलान, आदिल रशीद, जो रूट, बेन स्टोक्स, रीस टोपले, डेव्हिड विली, मार्क वूड, ख्रिस वोक्स.
न्यूझीलंड
केन विलियम्सन (कर्णधार), ट्रेंट बोल्ट, मार्क चॅपमन, डेवॉन कॉनवे, लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्री, टॉम लॅथम, डॅरिल मिचेल, जिमी नीशम, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, मिच सँटनर, ईश सोधी, टीम साऊदी, विल यंग. (cwc 2023 eng vs nz 1st match preview predicted eleven weather and live stream know all here)
हेही वाचा-
सर्वात मोठी बातमी! शिखर धवनचा पत्नी आयेशासोबत Divorce; कोर्टही म्हणालं, ‘धवन एक प्रतिष्ठित…’
ताज्या आयसीसी क्रमवारीत सिराजचा तोटा, फलंदाजांमध्ये गिल दुसऱ्या क्रमांकावर कायम, पण…