आयसीसी वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेत दोन मोठे उलटफेर करणारा संघ म्हणजे अफगाणिस्तान होय. आधी त्यांनी 2019 विश्वचषक विजेता इंग्लंड संघाचा पराभव केला. त्यानंतर त्यांनी पाकिस्तानलाही पराभवाचा धक्का दिला. मात्र, पाकिस्तानविरुद्ध मिळालेला विजय हा सर्वात मोठा ठरला. कारण, त्यांनी या क्रिकेट प्रकारात पाकिस्तानविरुद्ध पहिलाच वनडे विजय मिळवला. पाकिस्तानविरुद्धच्या विजयानंतर भारतीय संघाचा माजी दिग्गज अष्टपैलू इरफान पठाण आणि राशिद खान यांनी मैदानावर ठुमके लावले. आता इरफानला या डान्ससाठी एक खास भेटवस्तू मिळाली आहे. याची माहिती स्वत: इरफानने दिली आहे.
इरफान पठाण इंस्टाग्राम पोस्ट
इरफान पठाण (Irfan Pathan) याने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला आहे. यात त्याचा आणि राशिद खान (Rashid Khan) डान्स करतानाचा फोटो बनवला आहे. यामध्ये राशिद अफगाणिस्तानचा झेंडा घेऊन स्टेडिअममध्ये समालोचन करत असलेल्या इरफानसोबत डान्स करताना दिसत आहे. हा फोटो नेटकऱ्यांच्या पसंतीस पडत आहे. इरफानने हा फोटो शेअर करत खास कॅप्शनही दिले. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, “एका अफगाणी चाहत्याने बनवलेला सुंदर फोटो.”
https://www.instagram.com/p/Cyz5ORaIFWU/
आता इरफानच्या या फोटोवर चाहते प्रेमाचा वर्षाव करत आहेत. आतापर्यंत या पोस्टवर दीड लाखांहून अधिक लाईक्सचा पाऊस पडला आहे. तसेच, हजारांहून अधिक कमेंट्सही मिळाल्या आहेत. एका चाहत्याने लिहिले की, “त्यामुळेच माझे भारतावर आणि भारतीयांवर प्रेम आहे.” आणखी एकाने लिहिले की, “भारत अफगाणी भाऊ भाऊ.” आणखी एक जण असेही म्हणाला की, “भारतीय सर्वाधिक आनंदी आहेत.”
व्हिडिओ व्हायरल
खरं तर, इरफान पठाण आणि राशिद खान (Irfan Pathan And Rashid Khan) यांचा डान्स करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला होता. भारतीय अष्टपैलू अफगाणिस्तानच्या विजयावर खूपच खुश झाला होता. मात्र, त्याचा हा डान्स अनेक पाकिस्तानी चाहते आणि माजी खेळाडूंना आवडला नाहीये. त्यांनी इरफानच्या या डान्सवर टीकाही केली होती.
Right Now Entire India & Afganistan Dancing Like Irfan & Rashid.❤️🤝
#PAKvsAFG #CWC23 pic.twitter.com/5eXpBQWCfR
— Vishal Tiwari (@VishalTiwarii_) October 23, 2023
सामन्याविषयी बोलायचं झालं, तर या सामन्यात पाकिस्तानने अफगाणिस्तानला विजयासाठी 283 धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान अफगाणिस्तानने 49 षटकात 2 विकेट्स गमावत पूर्ण केले. तसेच, सामना 8 विकेट्सने जिंकला. पाकिस्तानविरुद्ध विश्वचषकात सर्वात मोठ्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग करण्याचा विक्रमही अफगाणिस्तानने आपल्या नावावर केला होता. (cwc 2023 former cricketer irfan pathan got a unique gift from afghanistani fan see picture)
हेही वाचा-
‘हा कुठला नंबर 1, ज्याला सरळ सिक्स…’, बाबरच्या फलंदाजीवर माजी दिग्गजाची तिखट प्रतिक्रिया
ICC ODI Rankigns: भारतीय त्रिकुट गाजवतंय वनडे रँकिंग, बाबरचा पत्ता लवकरच होऊ शकतो कट