विश्वचषक 2023 स्पर्धेत सोमवारी (दि. 06 नोव्हेंबर) श्रीलंका विरुद्ध बांगलादेश संघातील 38व्या सामन्यादरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कधीच न घडलेली घटना घडली. बांगलादेश संघाने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला. यावेळी श्रीलंका प्रथम फलंदाजीला उतरला. लंकेकडून सहाव्या क्रमांकावर अँजेलो मॅथ्यूज मैदानावर आला. मात्र, तो चेंडू न खेळताच मैदानाबाहेर गेला. अनुभवी मॅथ्यूजला टाईम आऊटनुसार बाद घोषित केले. असे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच घडले. अशाप्रकारे बाद झाल्यानंतर मॅथ्यूज चांगलाच भडकला. आता या दरम्यानचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
नेमकं काय घडलं?
खरं तर, अँजेलो मॅथ्यूज (Angelo Mathews) मैदानावर चुकीचे हेल्मेट घेऊन पोहोचला होता. त्यानंतर त्याने आपल्या संघाला डगआऊटमध्ये इशारा केला की, त्याच्यासाठी दुसरे हेल्मेट घेऊन या. मात्र, सर्वामध्ये खूपच वेळ खर्च झाला होता. त्यामुळे पंचांनी मॅथ्यूजशी याबाबत चर्चा केली. दुसरीकडे, बांगलादेशचे खेळाडू यावरून खुश नव्हते. त्यांनी पंचांकडे टाईम-आऊटची (Time-Out) अपील केली, त्यानंतर पंचांनी बांगलादेशची अपील स्वीकारत मॅथ्यूजला बाद घोषित केले. टाईम आऊट घोषित केल्यानंतर मॅथ्यूजच्या तळपायाची आग मस्तकात गेली. तो पंचांशी बाचाबाची करताना दिसला.
Mathews is so angry after the Timed out dismissal. pic.twitter.com/i1PlMmFEbR
— Johns. (@CricCrazyJohns) November 6, 2023
PEAK SRI LANKA VS BANGLADESH CRICKET IN DELHI…!!! pic.twitter.com/tUplaY2THK
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 6, 2023
व्हिडिओ व्हायरल
पंचांशी बाचाबाची केल्यानंतर मॅथ्यूज तंबूच्या दिशेने रवाना झाला. मात्र, यादरम्यान त्याचा राग कॅमेऱ्यात कैद झाला, जो मैदानातील क्रिकेटप्रेमींनी ‘याची देही याची डोळा’ पाहिला. मैदानाबाहेर पाय ठेवण्यापूर्वीच त्याने आपले हेल्मेट सीमारेषेबाहेर जोरात फेकले. यानंतर तो संघाच्या सपोर्ट स्टाफसोबतही याबाबत चर्चा करताना दिसला.
????????THIS is FIRST TIME in INTERNATIONAL CRICKET.
Bangladesh appealed against Angelo Mathews for timeout and he was given out. #SLvsBAN #BANvsSL #CWC23 pic.twitter.com/Dw7KBCdQN0
— ????????Bhanu (@singh_bhan33431) November 6, 2023
Angelo Mathews came with the wrong helmet.
Then Substitute came with the right helmet but time was passing & umpires were unhappy – then Bangladesh appealed for timed out and he was over 3 minutes so Mathews was given out. pic.twitter.com/ooOQ8QuIh2
— Johns. (@CricCrazyJohns) November 6, 2023
नियम काय सांगतो?
नियमानुसार, फलंदाज बाद झाल्यानंतर दुसऱ्या फलंदाजाला 3 मिनिटांमध्ये क्रीझच्या आत पोहोचायचे असते. मात्र, मॅथ्यूज मैदानावर पोहोचला होता, पण त्याला क्रीझपर्यंत वेळेत पोहोचता आले नाही. श्रीलंकेच्या फलंदाजाने मैदानात थांबूनच दुसऱ्या हेल्मेटसाठी मागणी केली होती. त्यामध्ये जास्त वेळ लागला. अशात बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसन (Shakib Al Hasan) याने टाईम-आऊटची अपील केली, जी पंचांनी स्वीकारली. अशात मॅथ्यूज हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टाईम आऊटनुसार बाद होणारा जगातील पहिलाच फलंदाज बनला.
टाईम आऊटसाठी एमसीसी नियम
विकेट पडल्यानंतर किंवा फलंदाज रिटायर्ड हर्ट झाल्यानंतर, येणाऱ्या फलंदाजाला 3 मिनिटाच्या आत क्रीझवर येऊन चेंडू खेळायचा असतो. जर असे झाले नाही, तर विरोधी संघ फलंदाजासाठी टाईम-आऊटची अपील करू शकतो आणि पंच नवीन फलंदाजाला बाद घोषित करू शकतात. (cwc 23 bangladesh vs sri lanka angelo mathews given time out fights with umpire see video)
हेही वाचा-
विराटच्या 79 शतकांचं सेलिब्रेशन पाहा एका मिनिटात । VIDEO
‘भारत विरुद्ध आख्खं जग…’, दक्षिण आफ्रिकेच्या नांग्या ठेचल्यानंतर पाकिस्तानातून आली मोठी प्रतिक्रिया