आयसीसी वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेतील सर्वात महत्त्वाचा पहिला उपांत्य सामना भारत विरुद्ध न्यूझीलंड या बलाढ्य संघात खेळला जाणार आहे. बुधवारी (दि. 15 नोव्हेंबर) वानखेडे स्टेडिअम या सामन्याचे आयोजन करण्यासाठी सज्ज झाले आहे. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 2 वाजता सुरुवात होणार आहे. त्यापूर्वी उभय संघात नाणेफेक झाली. ही नाणेफेक भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने जिंकली असून फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
भारतीय संघाने या सामन्यात कोणताही बदल केला नाहीये. दुसरीकडे, न्यूझीलंड संघातही कोणताच बदल झाला नाहीये.
उभय संघांची स्पर्धेतील कामगिरी
विश्वचषक 2023 (World Cup 2023) स्पर्धेतील उभय संघांची कामगिरी पाहिली, तर भारतीय संघाने आपल्या प्रदर्शनाने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. भारताने स्पर्धेत खेळलेल्या नऊच्या नऊ सामन्यात विजय मिळवला आहे. विशेष म्हणजे, यातील बऱ्याच सामन्यात भारताने एकतर्फी विजय मिळवला आहे. भारताने 4 सामने धावांचा बचाव करताना जिंकले आहेत. तसेच, 5 सामने आव्हानाचा पाठलाग करताना जिंकले आहेत. यासह भारत साखळी फेरीनंतर 18 गुणांसह पॉईंट्स टेबलमध्ये अव्वलस्थानी कायम राहिला. अशात भारत उपांत्य सामन्यात न्यूझीलंडला पराभूत करत आपला विजयीरथ कायम सुरू ठेवण्याचा प्रयत्न करेल.
दुसरीक़े, न्यूझीलंड संघाविषयी बोलायचं झालं, तर त्यांनी आतापर्यंत खेळलेल्या 9 सामन्यांपैकी 5 सामन्यात विजय मिळवला आहे, तर उर्वरित 4 सामन्यात न्यूझीलंडला पराभवाचा सामना करावा लागला आहे. विशेष म्हणजे, न्यूझीलंडने सुरुवातीचे सलग चारही सामने आपल्या नावावर केले होते. मात्र, नंतर त्यांनी लय गमावली. यासह न्यूझीलंड 10 गुणांसह पॉईंट्स टेबलमध्ये चौथ्या स्थानी राहिला. (cwc 23 India have won the toss and have opted to bat against new zealand)
विश्वचषक 2023 उपांत्य सामन्यासाठी उभय संघांची प्लेइंग इलेव्हन
भारत
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज
न्यूझीलंड
डेवॉन कॉनवे, रचिन रवींद्र, केन विलियम्सन (कर्णधार), डॅरिल मिचेल, मार्क चॅपमन, ग्लेन फिलिप्स, टॉम लॅथम (यष्टीरक्षक), मिचेल सँटनर, टीम साऊदी, लॉकी फर्ग्युसन, ट्रेंट बोल्ट
हेही वाचा-
IND vs NZ Pitch Controversy: सेमीफायनलपूर्वी मोठा वाद, BCCIवर खेळपट्टी बदलण्याचा आरोप; लगेच वाचा
World Cup Semifinal: वीरेंद्र सेहवागचा टीम इंडियाला मोलाचा सल्ला; म्हणाला, ’11 खेळाडूंनी सर्वोत्तम कामगिरी…’