मंगळवारचा (दि. 17 ऑक्टोबर) दिवस नेदरलँड्स क्रिकेट संघासाठी सर्वात खास ठरला. त्यांनी विश्वचषक 2023 स्पर्धेतील 15व्या सामन्यात मोठा उलटफेर करत बलाढ्य दक्षिण आफ्रिका संघाचा विजयरथ रोखला. त्यांनी टेम्बा बावुमा याच्या नेतृत्वातील आफ्रिकेला 38 धावांनी पराभवाचा धक्का दिला. यासह नेदरलँड्सने स्पर्धेतील आपल्या विजयाचं खातंही खोललं. धरमशाला येथे खेळल्या गेलेल्या सामन्यानंतर विजयी संघाचा कर्णधार स्कॉट एडवर्ड्स याने मोठे विधान केले.
धरमशाला येथील या सामन्यात नेदरलँड्स (Netherlands) संघ प्रथम फलंदाजीसाठी उतरला होता. पावसामुळे हा सामना 43 षटकांचा खेळवण्यात आला. या सामन्यात नेदरलँड्सने 43 षटकात 8 विकेट्स गमावत 245 धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिका (South Africa) संघ 42.5 षटकात 207 धावांवरच सर्वबाद झाला. त्यामुळे नेदरलँड्सने हा सामना सहजरीत्या 38 धावांनी खिशात घातला.
टेम्बा बावुमा याच्या नेतृत्वातील दक्षिण आफ्रिका (South Africa) संघाला विश्वचषक 2023 (World Cup 2023) स्पर्धेत पहिल्या पराभवाचं तोंड पाहावं लागलं. या उलटफेरानंतर नेदरलँड्सचा कर्णधार स्कॉट एडवर्ड्स (Scott Edwards) याने आशा व्यक्त केली की, आगामी सामन्यांमध्ये त्यांचा संघ सामने जिंकण्यावर लक्ष देईल. त्याने चाहत्यांना धन्यवादही दिला आणि असेही म्हटले की, त्यांच्या संघाचे लक्ष्य उपांत्य सामन्यात जागा बनवणे आहे.
काय म्हणाला स्कॉट?
सामन्यानंतर कर्णधार स्कॉट म्हणाला की, “खूप अभिमान वाटतोय. आम्ही जास्त अपेक्षेने आलो. आमच्याकडे खूपच चांगले खेळाडू होते. पहिला विजय मिळवून आनंद झाला. आशा आहे की, पुढे आम्ही आणखी विजय मिळवू. मागील दोन सामन्यात आम्ही चांगल्या स्थितीत होतो, पण पुन्हा चुकांमुळे सामन्यातून दूर झालो. काही भागीदारी झाल्या, ज्या चांगल्या होत्या. आम्ही जितक्या लक्ष्याचा विचार केला होता, तिथपर्यंत पोहोचलो. मला विश्वास आहे की, आमचे अनेक चाहते जागून हा सामना पाहत असतील.”
पुढे बोलताना तो असेही म्हणाला की, “आम्हाला आनंद आहे की, नेहमी चाहत्यांचा पाठिंबा मिळतो. आम्ही पाठिंब्यासाठी आभारी आहोत. आशा आहे की, काही चाहत्यांचे मेसेज मिळतील. आम्ही स्पर्धेत आलो आहोत आणि उपांत्य सामन्यात जागा बनवायची आहे. जर तुम्ही दक्षिण आफ्रिकेसारख्या संघाला मात देता, ज्याला किताबाचा प्रबळ दावेदार मानले जात आहे, कारण ते खूप चांगले खेळत आहेत, तेव्हा तुमचा विश्वास वाढतो. त्यामुळे हा विजय आमच्यासाठी शानदार राहिला.”
कर्णधाराची शानदार खेळी
खरं तर, या सामन्यात कर्णधार स्कॉट एडवर्ड्स याने नेदरलँड्सकडून सर्वाधिक धावा केल्या. त्याने 69 चेंडूत 1 षटकार आणि 10 चौकारांच्या मदतीने नाबाद 78 धावा केल्या. तसेच, संघाला समाधानकारक धावसंख्या मिळवून दिली. अशात नेदरलँड्सपुढे शनिवारी म्हणजेच 21 ऑक्टोबर रोजी श्रीलंकेचे आव्हान असेल. हा सामनाही लखनऊमध्ये होईल. (cwc23 netherlands captain scott edwards hopeful to win more matches in world cup 2023 after beating south africa)
हेही वाचा-
‘आमचा संघ फारसा…’, अफगाणिस्तानकडून पराभूत झाल्यानंतर इंग्लिश गोलंदाजाचं खळबळजनक वक्तव्य
BREAKING: वर्ल्डकपमध्ये दक्षिण आफ्रिका पुन्हा चोक! नेदरलँड्सने 38 धावांनी पाजले पाणी