---Advertisement---

CWG 2022 | भारतीय खेळाडूचा भीषण अपघात, थेट स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर नेण्याची आली वेळ

CWG 2022
---Advertisement---

इंग्लंडच्या बर्मिंघम शहरात सध्या कॉमनवेल्थ गेम्स म्हणजेच राष्ट्रकुल स्पर्धा खेळल्या जात आहेत. स्पर्धेच्या चालू हंगामात भारतीय खेळाडूंचे प्रदर्शन चांगले राहिले आहे. असे असले तरी, सायकलिंग स्पर्धेत एक अशी दुर्घटना घडली, जी प्रक्षकांना नक्कीच पाहण्याची इच्छा नव्हती. महिलांच्या १० किमी स्क्रॅच रेसदरम्यान एक भीषण अपघात घडला, ज्यामध्ये भारतीय सायकलस्वार मीनाक्षीला गंभीर दुखापत झाली. 

कॉमनवेल्थ गेम्स २०२२ (Commonwealth Games 2022) मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणारी मिनाक्षी (Meenakshi) एकटी नव्हती, जी या अपघातात शिकरा झाली. मिनाक्षीव्यतिरिक्त तिची प्रतिस्पर्धी न्यूझीलंडची ब्रायोनी बोथा देखील अपघाताचा भाग ठरला. मिनाक्षी ट्रॅकवर घसरल्यानंतर दुसरी सायकलस्वार तिच्या अंगावरून गेली. व्हिडिओत हा प्रसंग स्पष्टपणे पाहिला जाऊ शकतो.

न्यूझीलंडची ब्रायोनी बोथ हा अपघात होताना मीनाक्षीला अगदी जवळून पार करत होती. याच कारणास्तव ब्रायोनी बोथही अपघाताचा भाग बनली आणि सायकलवरून खाली पडली. रेस ट्रॉकवर हा प्रकार घडताच तत्काळ मेडिकल टीम त्याठिकाणी पोहोचली. दोन्ही खेळाडूंना स्पर्धेतून बाहेर केले गेले. मीनाक्षीला स्ट्रेचरच्या मदतीने ट्रॅकवरून उचलून न्यावे लागले. ती स्वतः चालण्याच्या अवस्थेत नव्हती, अशीही माहिती दिली जात आहे.

मिनाक्षीच्या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कॉमनवेल्थ गेम्सचा भाग असलेली ही सायकस स्पर्धा वॅली वेलो पार्कमध्ये आयोजित केली जात आहे. हंगामातील  घडलेला हा दुसरा गंभीर अपघात आहे.  दरम्यान, या कायलिंग स्पर्धेचा विचार केला, तर इंग्लंडची लॉरा केनी (Laura Kenny) या रेसमध्ये सहभागी होती. लॉरानेच स्पर्धेचे सुवर्ण पदक जिंकले.

भारताने यावर्षी कॉमनवेल्थ स्पर्धेत केलेल्या कामगिरीचा विचार केला, तर स्पर्धेच्या पाचव्या दिवशी पदकांची एकून संघ १० पर्यंत पोहोचली. यामध्ये चार सुवर्ण, तीन रौप्य आणि तीन कांस्य पदकांची समावेश आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या – 

अल्टीमेट खो-खो पहिल्या हंगामाच्या कार्यक्रमाची घोषणा

तब्बल ८७ हजार प्रेक्षकांपुढे महिला फुलबॉलरने काढला टी-शर्ट, ‘स्पोर्ट्स ब्रा’वरचे सेलिब्रेशन व्हायरल

बाबो! झिम्बाब्वेचा पठ्ठ्या युवराजचा रेकॉर्ड मोडता-मोडता राहिला, एका षटकात कुटल्या ‘एवढ्या’ धावा

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---