---Advertisement---

पत्नीच्या यशाने कार्तिक इमोशनल, ब्रॉन्ज मेडल विजयानंतर ‘या’ शब्दांत केला कौतुकाचा वर्षाव

Dinesh-Karthik-And-Dipika-Pallikal
---Advertisement---

इंग्लंडच्या बर्मिंघम शहरात नुकच्यात कॉमवेल्थ गेम्स स्पर्धा पार पडल्या. भारतीय खेळाडूंनी यावर्षीच्या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केली. भारताने एकूण ६१ पदके जिंकली आहेत. भारतीय पुरुष क्रिकेट संघाचा अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक साठी देखील कॉमवेल्थ गेम्स स्पर्धा खास ठरली. कारण कार्तिकची पत्नी दीपिका पल्लीकल हिने या स्पर्धेत कांस्य पदक पटकावले आहे. 

दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) याची पत्नी दीपिका पल्लीकल (Dipika Pallikal) कॉमवेल्थ गेम्स २०२२ (Commonwealth Games 2022) मध्ये अप्रतिम प्रदर्शन करताना दिसली. तिने या स्पर्धत स्वतःची वेगळी झाप सोडलीच, पण देशाच्या पदकांची संख्या वाढवण्यासाठी देखील योगदान दिले. दीपिकाने स्क्वॅश दुरेही स्पर्धत सौरव घोषाल (Sourav Ghoshal) सोबत मिळून देशासाठी कांस्य पदकाची कमाई केली. दीपिकाच्या या कामगिरीनंतर कार्तिक खूपच खुश असल्याचे पाहिले गेले आहे.

कार्तिकने स्वतःच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून दीपिका आणि तिचा सहकारी सौरव यांच्यासाठी खास पोस्ट केली. या दोघांच्या कौतुकात कार्तिकने लिहिले की, “मेहनत आणि चिकाटीचे फळ मिळाले. तुम्हा दोघांसाठी खूप आनंदी आहे आणि अभिमान देखील आहे.” कार्तिकने या पोस्टमध्ये दीपिका आणि सौरव या दोघांना टॅग केले आहे, तसेच दोघांचा फोटोही शेअर केला आहे.

दरम्यान, दीपिक आणि सौरवने या कांस्य पदकासाठी रविवारी (७ ऑगस्ट) लढत दिली. या जोडीने ऑस्ट्रेलियाच्या लोबन डोना आणि कॅमरून पिले या दोघांचा पराभव केला. भारतीय जोडीने हा सामना ११-८, ११-४ अशा अंतराने नावावर केला.

कॉमवेल्थ गेम्सच्या चालू हंगामातील भारतीय संघाच्या प्रदर्शनाचा विचार केला, तर भारताला एकूण ६१ पदके मिळाली आहेत. यामध्ये १८ सुवर्ण पदक, १५ रौप्य पदक आणि २२ कांस्य पदकांचा समावेश आहे. कुस्ती, वेटलिफ्टिंग अशा खेळाडूंमध्ये भारताने जबरदस्त कामगिरी केली. भारत कॉमनवेल्थ गेम्सच्या या हंगामात सर्वाधिक पदक जिंकणाऱ्यां देशांमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे.

भारतीय क्रिकेट संघाने नुकत्याच पार पडलेल्या वेस्ट इंडीज दौऱ्यात जबरदस्त प्रदर्शन केले. वेस्ट इंडीजविरुद्धच्या एकदिवसीय आणि टी-२० या दोन्ही मालिका भारताने नावावर केला आहे. कार्तिकचे या दौऱ्यातील प्रदर्शन सर्वसाधारण राहिले. आयपीएल २०२२ नंतर कार्तिकने मोठ्या काळानंतर भारतीय संघात पुनरागमन केले होते. आता कार्तिक आगामी आशिया चषकातही भारतासाठी खेळणार आहे. तसेच ऑस्ट्रेलियात खेळवल्या जाणाऱ्या टी-२० विश्वचषकच्या संघातही त्याला संधी मिळू शकते.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या – 

INDvsPAK: पाकिस्तानचा सूड घेण्यास तयार आहेत भारत! आशिया चषकाच्या प्रोमोत दिसले रोहितचे रौद्ररूप

भारतीय क्रिकेटच्या नव्या हंगामाचा या दिवशी फुटणार नारळ; मानाच्या स्पर्धेचे कमबॅक

रोहित कॅप्टन बनताच टीम इंडियात झाले बदल, आता पाकिस्तान येणार गोत्यात?

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---