---Advertisement---

राष्ट्रकुल स्पर्धा 2018: भारताला स्क्वॅशमध्ये पहिले पदक

---Advertisement---

गोल्ड कोस्ट| २१ व्या राष्ट्रकुल स्पर्धेत दिपिका पल्लिकल आणि सौरव घोसल या जोडीने स्क्वॅशच्या मिश्र दुहेरीत भारतासाठी रौप्य पदक मिळवले . भारताचे हे या स्पर्धेतील स्क्वॅशचे पहिले पदक आहे.

आज झालेल्या अंतिम सामन्यात दिपिका आणि सौरव या जोडीला ऑस्ट्रलियाच्या डोना उरकुपर्त आणि कॅनेरॉन पिले जोडीकडून पराभूत व्हावे लागले.

30 मिनीटे चाललेल्या या सामन्यात दिपिका आणि सौरव पहिल्या फेरीत 8-11 ने तर दुसऱ्या फेरीत 10-11 ने डोना आणि कॅनेरॉनकडून पराभूत झाले. यामुळे या सामन्यात दिपिका आणि सौरव या भारतीय जोडीला 0-2 पराभव स्वीकारावा लागल्याने रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.

ऑस्ट्रलियासाठी हे घरचे मैदान असल्याने ते पहिल्या फेरीपासूनच आक्रमक खेळत होते. दुसरी फेरी अटीतटीची झाली. तसेच यावेळी पंचाचे काही निर्णयही भारताच्या विरोधात गेले.

दिपिकाचे हे राष्ट्रकुल स्पर्धेतील दुसरे तर सौरवचे पहिलेच पदक आहे. 2014 ग्लासगोमधील राष्ट्रकुल स्पर्धेत तिने महिला दुहेरीत सुवर्ण पदक मिळवले होते.

तसेच भारताला  स्क्वॅशमध्ये सुवर्ण पदक जिंकण्याची अजून एक संधी आहे. उद्या दिपीका पल्लिकल आणि जोशना चिनाप्पा या जोडीचा महिला दुहेरीचा अंतिम सामना आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment