पुणे: फर्ग्युसन कॉलेज आणि नंदन बाळ टेनिस अकादमी यांच्या तर्फे आयोजित व एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या डी.ई.एस. फर्ग्युसन कॉलेज एमएसएलटीए चॅम्पियनशीप सिरीज 12वर्षांखालील टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत मुलांच्या गटात स्मित उंद्रे याने एकेरी व दुहेरी या दोन्ही गटात अंतिम फेरीत प्रवेश करत दुहेरी मुकुटाकडे वाटचाल केली आहे. मुलींच्या गटात काव्या पांडे, सृष्टी सूर्यवंशी या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.
फर्ग्युसन कॉलेज टेनिस कोर्ट या ठिकाणी सुरु असलेल्या या स्पर्धेत मुलांच्या गटात उपांत्य फेरीत अव्वल मानांकित स्मित उंद्रेने तिसऱ्या मानांकित क्रिशय तावडेचा 6-3, 6-4 असा तर, दुसऱ्या सामन्यात दुसऱ्या मानांकित वरद उंद्रेने नमिश हूडचा 6-3, 6-4 असा पराभव करून अंतिम फेरी गाठली. दुहेरीत उपांत्य फेरीत स्मित उंद्रे व वरद उंद्रे या अव्वल मानांकित जोडीने हुसेन सैफी व अक्षत दक्षिणदास या जोडीचा 6-3, 6-4 असा तर, नमिश हूड व आर्यन कीर्तने यांनी क्रिशय तावडे व वीरेन चौधरी यांचा 6-3, 6-4 असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.
मुलींच्या गटात उपांत्य फेरीत चौथ्या मानांकित काव्या पांडेने अव्वल मानांकित स्वरा जावळेचा 6-4, 6-4 असा संघर्षपूर्ण पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली. तर, दुसऱ्या उपांत्य फेरीच्या लढतीत दुसऱ्या मानांकित सृष्टी सूर्यवंशीने वीरा हरपुडेचा 6-4, 6-0 असा पराभव केला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: उपांत्य फेरी:
स्मित उंद्रे[1] वि.वि.क्रिशय तावडे [3] 6-3, 6-4;
वरद उंद्रे [2] वि.वि.नमिश हूड 6-3, 6-4;
मुली:
काव्या पांडे[4] वि.वि.स्वरा जावळे [1]6-4, 6-4;
सृष्टी सूर्यवंशी[2] वि.वि.वीरा हरपुडे 6-4, 6-0;
दुहेरी: मुले: उपांत्य फेरी:
स्मित उंद्रे/वरद उंद्रे[1] वि.वि.हुसेन सैफी/अक्षत दक्षिणदास[3]6-3, 6-4;
नमिश हूड/आर्यन कीर्तने वि.वि.क्रिशय तावडे/वीरेन चौधरी[2] 6-3, 6-4.
महा स्पोर्ट्चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
मयंक अगरवालने IPL 2022मध्ये का केली खराब कामगिरी? हरभजन सिंगने दिले स्पष्टीकरण
‘गब्बर’ पडलाय प्रेमात! व्हिडिओ शेअर करत धवनने लिहिले, ‘मोहम्मत मैं बादशाह भी गुलाम बन जाता है’
पहिले पाढे पंचावन्न..! लाख प्रयत्न करूनही आरसीबीच्या पदरी पुन्हा अपयशच