दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेन हा त्याच्या मैदानावरील कामगिरी बरोबरच सोशल मिडीयावरही तेवढाच तत्पर असतो. यावेळी त्याने ट्विटरवरून चाहत्यांना त्याला प्रश्न विचारण्यासाठी ट्विट केले होते.
‘माझ्याकडे 10 मिनिटे आहे, यामध्ये तुम्ही कोणतेही प्रश्न विचारू शकता’, असे ट्विट स्टेनने केले आहे.
यावेळी स्टेनला अनेकांनी प्रश्न विचारले. त्यामध्ये त्याला त्याची आतापर्यंतची गोलंदाजील उत्तम कामगिरी, आवडता आयपीएलचा संघ, आतापर्यंतचा वेगवान चेंडू कोणता असे अनेक प्रश्न विचारले होते.
मात्र यातील एका ट्विटर युजरने ‘तुला भारताचा गोलंदाजी प्रशिक्षक बनवला तर तू होणार का ?’ असा प्रश्न विचारला होता. याला स्टेनने मजेशीर उत्तर दिले.
If India promote you as their bowling coach will you?
— Ankur Sharma (@gyani_sharmaji) January 31, 2019
‘त्यासाठी त्यांनी क्रेडिट कार्ड तयार ठेवा’, असे उत्तर स्टनने दिले आहे.
They better pull out the credit card
— Dale Steyn (@DaleSteyn62) January 31, 2019
भारतीय संघाच्या सध्याची गोलंदाजी फळीचे सर्वांनीच कौतुक केले आहे. भारताने मागील अनेक सामन्यात प्रतिस्पर्धी संघाला सर्वबाद करण्यातही यश मिळवले आहे. तसेच नुकत्याच पार पडलेल्या इंग्लंड, ऑस्ट्रेलिया दौऱ्यातही भारतीय संघाचे गोलंदाज चांगलेच चमकले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
–मोठं कारण मिळालं! पाचव्या वनडेत रोहितचे द्विशतक पक्के!
–काय सांगता! अनुष्का शर्मा आणि साक्षी धोनी होत्या स्कूलमेट
–२०१९च्या विश्वचषकाआधी टीम इंडिया या संघाविरुद्ध खेळणार सराव सामने