---Advertisement---

कसोटीत स्टेन गन पुन्हा धडाडणार नाही; डेल स्टेनची कसोटीतून निवृत्ती

On: सोमवार, ऑगस्ट 5, 2019 9:45 PM
---Advertisement---

दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेनने कसोटी क्रिकेटमधून आज निवृत्ती घोषित केली आहे. त्याने 2004 ते 2019 या कालावधीत 93 कसोटी सामने खेळताना 439 विकेट्स घेतल्या आहेत.

स्टेनने त्याचा पहिला कसोटी सामना इंग्लंडविरुद्ध डिसेंबर 2004मध्ये पोर्ट एलिझाबेथमध्ये खेळला होता. विशेष म्हणजे पोर्ट एलिथाबेथलाच फेब्रुवारी 2019 मध्ये झालेला दक्षिण आफ्रिका विरुद्ध श्रीलंका संघातील सामना त्याच्या कारकिर्दीतील शेवटचा कसोटी सामना ठरला आहे.

निवृत्ती घेताना त्याने म्हटले आहे की ‘आणखी एक कसोटी खेळायची नाही हा विचार भयंकर आहे पण त्यापेक्षा पुन्हा कधीही न खेळण्याचा विचार करणे हे सर्वात भयानक आहे. त्यामुळे मी माझ्या उर्वरीत कारकीर्दीत माझी क्षमता  वाढवण्यासाठी आणि या खेळातील माझे दीर्घायुष्य सुनिश्चित करण्यासाठी मी वनडे आणि टी20वर लक्ष केंद्रीत करण्याचा निर्णय घेतला आहे.’

‘मी आज मला सर्वाधिक आवडणाऱ्या क्रिकेट प्रकारातून निवृत्ती घेत आहे. माझ्या मते कसोटी क्रिकेट हे या खेळातील सर्वोत्तम आवृत्ती आहे. कसोटी क्रिकेट तूमची मानसिकता, शारिरिक क्षमता आणि भावनिक क्षमता तपासते.’

36 वर्षीय स्टेन मागील अनेक दिवसांपासून दुखापतींचा सामना करत आहे. 2019 विश्वचषकातूनही त्याला खांद्याच्या दुखापतीमुळे बाहेर पडावे लागले होते.

स्टेन दक्षिण आफ्रिकेचा कसोटीमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज आहे. तसेच कसोटीमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या जगातील एकूण गोलंदाजांमध्ये स्टेन आठव्या क्रमांकावर आहे. स्टेन कसोटी क्रिकेट क्रमवारीत 263 आठवड्यांसाठी अव्वल क्रमांकावर होता.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

सुरेश रैनाला मागे टाकत किंग कोहलीचा टी२० क्रिकेटमध्ये मोठा पराक्रम

शानदार अर्धशतकी खेळी करत रोहित शर्माचा टी२०मध्ये विश्वविक्रम; विराटला टाकले मागे

‘यूनिवर्स बॉस’ ख्रिस गेलला मागे टाकत ‘हिटमॅन’ रोहित शर्माने केला मोठा विश्वविक्रम

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment