---Advertisement---

शानदार अर्धशतकी खेळी करत रोहित शर्माचा टी२०मध्ये विश्वविक्रम; विराटला टाकले मागे

On: सोमवार, ऑगस्ट 5, 2019 10:54 AM
---Advertisement---

फ्लोरीडा। रविवारी(4 ऑगस्ट) वेस्ट इंडीज विरुद्ध भारत संघात दुसरा टी20 सामना लॉडरहिल, फ्लोरिडा येथे पार पडला. या सामन्यात भारताने डकवर्थ लुईस नियमानुसार 22 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात भारताचा उपकर्णधार रोहित शर्माने अर्धशतकी खेळी करण्याबरोबरच एक खास विश्वविक्रम केला आहे.

त्याने या सामन्यात 51 चेंडूत 67 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 6 चौकार आणि 3 षटकार मारले. याबरोबर आंतरराष्ट्रीय टी20मध्ये सर्वाधिक वेळा 50 किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी करण्याचा विश्वविक्रमही रोहितने केला आहे.

रोहितने 21 व्यांदा आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये 50 किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी केली आहे. यामध्ये त्याच्या 17 अर्धशतकांचा आणि 4 शतकांचा समावेश आहे.

याआधी आंतरराष्ट्रीय टी20मध्ये सर्वाधिकवेळा 50 किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी करण्याचा विक्रम रोहित आणि भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या नावावर विभागून होता.

रविवारीच्या सामन्याआधी या दोघांनीही 20 वेळा आंतरराष्ट्रीय टी20मध्ये 50 किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्या होत्या. पण आता रोहितने रविवारी 67 धावांची खेळी करत विराटला मागे टाकले आहे.

आंतरराष्ट्रीय टी20मध्ये सर्वाधिक वेळा 50 किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी करणारे खेळाडू-

21- रोहित शर्मा, सामने- 96

20- विराट कोहली, सामने- 69

16- मार्टिन गप्टील, सामने- 76

15- ख्रिस गेल, सामने- 58

15- ब्रेंडन मॅक्क्यूलम, सामने- 71

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

‘यूनिवर्स बॉस’ ख्रिस गेलला मागे टाकत ‘हिटमॅन’ रोहित शर्माने केला मोठा विश्वविक्रम

विंडीज विरुद्धच्या दुसऱ्या टी२० सामन्यासाठी अशी आहे ११ जणांची टीम इंडिया

थायलंड ओपन: सात्विकसाईराज-चिराग शेट्टीने विजेतेपद जिंकत रचला इतिहास

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment