इंडियन प्रीमियर लीग हा असा मंच आहे, जिथे युवा किंवा अनुभवी क्रिकेटपटूंना त्यांची प्रतिभा दाखवण्याची संधी मिळते. बऱ्याचशा अनकॅप्ड खेळाडूंनी आयपीएलमध्ये दमदार प्रदर्शन करत भारतीय संघात प्रवेश केला असल्याची, तसेच खराब फॉर्ममुळे संघातून बाहेर झाल्यानंतर आयपीएलमध्ये त्यांनी पुन्हा फॉर्म मिळवत भारतीय संघातील आपली जागा परत मिळवली असल्याची बरीच उदाहरणे आहेत. दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज आणि सनरायझर्स हैदराबादचा गोलंदाजी प्रशिक्षक डेल स्टेन यालाही असे वाटते की, राहुल त्रिपाठीकडे भारताच्या टी२० संघात जागा बनवण्याची सुवर्णसंधी आहे.
त्रिपाठीने (Rahul Tripathi) या हंगामात सनरायझर्स हैदराबादचे (Sunrisers Hyderabad) प्रतिनिधित्त्व करताना धडाकेबाज खेळ दाखवला आहे. त्याने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना या हंगामात ९ सामन्यांमध्ये ३८च्या सरासरीने २२८ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेट १७२.७२ इतका राहिला आहे.
३१ वर्षीय त्रिपाठीमुळे हैदराबाद संघाच्या मधल्या फळीत आवश्यक संतुलन निर्माण झाले आहे, जे मागील काही हंगामांमध्ये दिसून आले नव्हते. परिणामी त्रिपाठी भारताच्या टी२० संघाच्या संतुलनात एका स्थानाचा हक्कदार दिसत आहे. परंतु अद्याप त्याला भारतीय संघाकडून खेळण्याची (Team India) संधी मिळाली नसल्याचे स्टेनला आश्चर्य वाटत आहे.
स्पोर्ट्सकिडाशी बोलताना स्टेन (Dale Steyn Statement On Rahul Tripathi) म्हणाला की, “मला विश्वास आहे की, त्रिपाठीकडे भारताच्या टी२० संघात (T20 World Cup) जागा बनवण्याची चांगली संधी आहे. आयपीएल एक असा मंच आहे, जिथे खेळाडूंना इतके चांगले प्रदर्शन करण्याची संधी मिळते. भारतीय राष्ट्रीय संघ याच पूलमधून खेळाडूंची निवड केली जाते. परंतु विचित्र गोष्ट म्हणजे, आतापर्यंत त्याला भारतीय संघात जागा मिळालेली नाही.”
हैदराबाद संघाने आयपीएल २०२२च्या मेगा लिलावात त्रिपाठीला ८.५ कोटी खर्च करून विकत घेतले होते. कारण त्याचा जुना संघ कोलकाता नाईट रायडर्सही त्याला विकत घेण्यासाठी शर्यतीत होता. परंतु हैदराबादने अखेर त्याला आपल्या ताफ्यात सहभागी केले. कोलकाता संघाकडून खेळताना त्रिपाठीचे संघातील स्थान निश्चित नव्हते. त्यामुळे तो मागील हंगामात १७ सामने खेळूनही ३९७ धावाच करू शकला होता. मात्र आता हैदराबाद संघात त्याचे तिसऱ्या क्रमांकावरील स्थान निश्चित असल्याने तो दमदार प्रदर्शन करत आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
केवळ ऋतुराजच नाही, तर यापूर्वी हे चार खेळाडूही आयपीएलमध्ये झालेत ९९ धावांवर बाद
गौतम गंभीरने जेंटलमन क्रिकेटच्या प्रतिमेला केले मलिन! विजयानंतर दिसला शिवीगाळ करताना