इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत गोलंदाज आणि फलंदाजांना समान महत्व दिले जाते. कारण एक चांगला गोलंदाज तुम्हाला गडी बाद करून देऊ शकतो; तर एक चांगला फलंदाज तुम्हाला जास्त धावसंख्या उभारण्यात मदत करू शकतो. परंतु हे मात्र खरे आहे कि, इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत फलंदाजांची अधिक चांदी असते. कारण टी-२० क्रिकेटमध्ये प्रत्येक फलंदाज चौकार आणि षटकार मारण्याच्या प्रयत्नात असतो. त्यामुळे चेंडू मिस हिट झाला तरीही तो सीमारेषेच्या बाहेर जात असतो. अशातच दक्षिण आफ्रिका संघाचा दिग्गज वेगवान गोलंदाज डेल स्टेन याने एका गोष्टीबाबत खंत व्यक्त केली आहे.
दक्षिण आफ्रिकन संघाचा वेगवान गोलंदाज आणि आयपीएल स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचे प्रतिनिधित्व करणारा गोलंदाज डेल स्टेन याला वाटते की, तो जर गोलंदाजीसह चांगली फलंदाजी करू शकला असता. तर तो अधिक पैसे कमावू शकला असता.
ईसीपीएनवर संजय मांजरेकरसोबत चर्चा करताना डेल स्टेनने म्हटले की, “मला चांगली फलंदाजी येत नाही, याचा मला पश्चाताप होत आहे. मी सुरुवातीच्या काळात गोलंदाजीसह फलंदाजीवरही लक्ष दिले असते. तर कमीत कमी २० च्या सरासरीने फलंदाजी करू शकलो असतो. कोणास ठाऊक मी ख्रिस मॉरिससारखा अष्टपैलू खेळाडूही बनलो असतो, तर मी आयपीएल स्पर्धेत आणखी पैसे कमावु शकलो असतो.” (Dale Steyn statement about his batting)
तो म्हणाल कि, “मी हायस्कुलनंतर प्रशिक्षण घेत असताना पहिल्याच वर्षी माझी मांसपेशी खेचली गेली होती. त्यामुळे मी सहा महिने तरी गोलंदाजी केली नव्हती. त्यामुळे मी निर्णय घेतला होता की, मी गोलंदाजी करेल. मी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी केली आणि अकॅडेमीमध्ये ‘बॅट्समन ऑफ द इयर’ चा पुरस्कार पटकावला होता. माझ्या मते हे हास्यास्पद आहे. त्यानंतर मी टायटन्समध्ये खेळण्यासाठी प्रिटोरियाला गेलो होतो.”
तसेच तो पुढे म्हणाला, “मी जेव्हा तिथे पोहोचलो तेव्हा माझी भेट फाफ डू प्लेसीस आणि एबी डिविलियर्ससोबत झाली होती. त्यानंतर मी एल्वीरो पीटरसनसोबत मिळून गोलंदाजी करायला सुरूवात केली. मला जाणीव झाली होती की, मी एक फलंदाज बनू शकतो. परंतु हे खूप चांगले फलंदाज होते. मग मी विचार केला की, मी टायटन्स किंवा दक्षिण आफ्रिका संघासाठी खेळण्यासाठी जात असेल. तर मला माझ्या गोलंदाजीवर अधिक लक्ष्य केंद्रित करणे गरजेचे आहे.”
महत्वाच्या बातम्या-
नाद करा पण आमचा कुठं! गोलंदाज झुलन गोस्वामीची विश्वविक्रमी कामगिरी, आजवर कोणालाही नाही जमली
भर सामन्यात बेशुद्ध पडल्या होत्या विंडिजच्या २ महिला क्रिकेटर, रुग्णालयातून आली मोठी अपडेट
स्म्रिती मंधानाने बाउंड्रीजवळ टिपला अप्रतिम झेल, व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल ‘सुपरवुमन’






