---Advertisement---

“आयपीएलमध्ये खेळापेक्षा पैशाचीच चर्चा अधिक, पण पीएसएलमध्ये मात्र…”, डेल स्टेनचे खळबळजनक विधान

On: मंगळवार, मार्च 2, 2021 8:02 PM
---Advertisement---

पाकिस्तानमध्ये सध्या पाकिस्तान सुपर लीगचा म्हणजेच पीएसएल थरार सुरू आहे. विदेशातील अनेक नामांकित खेळाडू या स्पर्धेमध्ये सामील झालेले दिसून येतात. दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज वेगवान गोलंदाज डेल स्टेन या लीगमध्ये क्वेटा ग्लॅडिएटर्स संघाचा भाग आहे. त्याचवेळी, स्टेनने पीएसएल व आयपीएल यांची तुलना करताना मोठे वक्तव्य केले आहे.

आयपीएलपेक्षा पीएसएल फायदेशीर
सध्या पाकिस्तानमध्ये पीएसएलचा सहावा हंगाम सुरू आहे. या हंगामामध्ये दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज वेगवान गोलंदाज डेल स्टेनने क्वेटा ग्लॅडिएटर्सचे प्रतिनिधित्व करताना दिसून येतोय. त्याच वेळेस स्टेनने भारतातील सुप्रसिद्ध आयपीएल व पीएसएल यांची तुलना करताना म्हटले, “आयपीएलपेक्षा इतर लीगमध्ये खेळणे फायदेशीर ठरते. आयपीएलमध्ये मोठमोठी पथके असतात आणि तुम्हाला किती पैसे मिळाले आहेत याची चर्चा होत असते. त्यामुळे क्रिकेट मागे पडते. मला या चर्चेतून काहीवेळ सुटका हवी होती. खेळाला महत्त्व दिले जाणे गरजेचे आहे.”

स्टेनने मागील वर्षे फेब्रुवारी महिन्यात आपला अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला आहे. मागील वर्षाच्या अखेरीस श्रीलंकेत झालेल्या लंका प्रीमियर लीगमध्ये देखील त्याने भाग घेतला होता. एकेकाळी दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज असलेला स्टेन दुखापतीमुळे नियमितपणे क्रिकेट खेळत नाही.

आयपीएलमधील मोठे नाव होता स्टेन
आंतरराष्ट्रीय क्रिकेटप्रमाणेच स्टेन आयपीएलमधील देखील मोठ्या खेळाडूंमध्ये सामील होता. स्टेनने आयपीएलमध्ये आतापर्यंत रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, डेक्कन चार्जर्स, सनरायझर्स हैदराबाद व गुजरात लायन्स संघांचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याने आपल्या आयपीएल कारकिर्दीत ९५ सामने खेळताना ९७ बळी मिळविले आहेत.

आयपीएल २०२० मध्ये अतिशय सुमार कामगिरी केल्याने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने त्याला करारमुक्त केले होते. त्यानंतर त्याने नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच आपण पुढील आयपीएलमध्ये सहभागी होणार नाही, असे जाहीर केले होते.

महत्वाच्या बातम्या:

आयसीसी वनडे क्रमवारी : स्मृती मंधानाची घसरण, तर झुलन गोस्वामी-मिताली राज अव्वल दहामध्ये कायम

बजरंग पुनिया घेतोय सोशल मीडियापासून ब्रेक, हे आहे कारण

चौथ्या कसोटी सामन्यात रोहित-शुबमनलाच मिळणार का सलामीला संधी? हे आहेत भारतीय संघासमोरील पर्याय

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---