भारताने रविवारी (१५ ऑगस्ट) ७५ वा स्वातंत्र्यदिन साजरा केला. यावेळी पंतप्रधानांसह अनेक मान्यवरांनी देशवासियांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर अनेक भारतीय क्रिकेटपटूंनी देखील व्हिडिओ, फोटो शेअर करत सोशल मीडियाद्वारे स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. भारतीय संघाचा आघाडीचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने देखील इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ त्याची मुलगी आयराचा आहे.
मोहम्मद शमीने शेअर केलेल्या व्हिजिओमध्ये त्याची मुलगी आयरा ‘ए वतन वतन मेरे आबाद रहे तू …’ या प्रसिद्ध हिंदी गाण्यावर ७५ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त नाचताना दिसत आहे.
सध्या भारतीय संघासोबत इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या शमीने आपल्या मुलीचा देशभक्तीपर गाण्यावर नाचतानाचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करत त्याने लिहिले, “आजचा दिवस असा आहे की, आपण या देशाचा एक भाग आहोत, याचा अभिमान वाटला पाहिजे. आशा आहे की, स्वातंत्र्याची ही भावना आपल्याला जीवनात यश आणि उंचीवर घेऊन जाईल. स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा.”
https://www.instagram.com/p/CSlWkKwiYLs/
शमी अनेकदा आपल्या मुलीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतो. त्याच्या प्रत्येक पोस्टला चाहते नेहमीच भरभरून प्रेम व प्रतिसाद देत असतात.
सध्या आता शमी आणि त्याची पत्नी हसीन जहां यांच्यात वाद चालू आहे. हसीनने शमीवर अनेक गंभीर आरोप केले होते.
उल्लेखनीय आहे की, इंग्लंड विरुद्ध भारत यांच्या दरम्यान सुरू असलेला पाच कसोटी मालिकेंचा सामना सध्या लॉर्ड्स मैदानावर सुरू आहे. रविवार (१५ ऑगस्ट ) सामन्याचा चौथा दिवस होता. शमी देखील भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनचा भाग असून तो लॉर्ड्स मैदानावर दुसरी कसोटी खेळत आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
वेस्ट इंडिजच्या वेगवान गोलंदाजाला आयसीसीने फटकारले; मैदानावर केले ‘हे’ गैरवर्तन
राष्ट्रकुल स्पर्धा २०२२ मध्ये ‘या’ देशाचा संघ करणार वेस्ट इंडिज क्रिकेटचे प्रतिनिधित्व
‘हे क्रिकेटचे पीच आहे, तुमच्या घराचे अंगण नाही’, अँडरसनवर भडकला कर्णधार कोहली