भारताची स्टार कुस्तीपटू बबीता फोगट लवकरच आई होणार आहे. तिने तिच्या सोशल मीडिया अकांउंटवर बेबी बंपसह पती विवेक सुहाग बरोबरचा एक फोटो शेअर करत ही गोड बातमी दिली आहे. 20 नोव्हेंबरला 31 वा वाढदिवस साजरा करणाऱ्या बबीताने मागीलवर्षी कुस्तीपटू असणाऱ्या विवेकबरोबर लग्न केले होते.
तिने विवेकबरोबर शेअर केलेल्या फोटोला कॅप्शन दिले आहे की ‘तुझी पत्नी म्हणून तुझ्याबरोबर घालवलेल्या प्रत्येक क्षणी मला वाटले की मी भाग्यवान आहे. तू माझ्यासाठी माझी आनंदाची जागा आहे. तू मला पूर्ण केले आहेस. माझ्या आयुष्यातील नवीन अध्याय सुरु होण्याची वाट पाहात आहे. त्यासाठी मी उत्सुक आहे.’
Every single moment that I spend being your wife, I realize how lucky I am to live such an amazing life. You are my happy place." You complete me❤️🧿
“I’m excited & waiting to start this new chapter in my life”✨🤰👶🏻 pic.twitter.com/Y8IumPYji8— Babita Phogat (Modi Ka Parivar) (@BabitaPhogat) November 21, 2020
बबीताने भारताकडून २००९ आणि २०११ च्या राष्ट्रकुल चॅम्पियनशीपमध्ये सुवर्णपदक जिंकले आहे. तसेच तिने २०१० आणि २०१८ च्या राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्य पदकाची कमाई केली आहे. तर २०१४ च्या राष्ट्रकुल स्पर्धेत तिला सुवर्णपदक मिळाले. याबरोबरच २०१२ ला तिने विश्व कुस्ती चॅम्पियनशीपमध्ये कांस्य पदक मिळवले आहे. त्याचबरोबर २०१३ ला दिल्ली येथे झालेल्या एशियन चॅम्पियनशीपमध्ये तिने कांस्य पदक मिळवले आहे.
बबीताला २०१५ मध्ये अर्जून पुरस्कारानेही गौरविण्यात आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
…म्हणून WFI ने महिला राष्ट्रीय शिबिर रद्द करण्याचा घेतला निर्णय
वाढदिवस विशेष: भारताची स्टार कुस्तीपटू बबीता फोगटबद्दल खास ५ गोष्टी घ्या जाणून
…म्हणून दोनवेळचा ऑलिंपिक पदक विजेता सुशील कुमार सोडणार होता मॅटवरील कुस्ती