रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरूद्ध कोलकाता नाईट रायडर्सचा सामना आज चेन्नईच्या मैदानावर खेळविण्यात आला. या सामन्यात बंगलोरने आपला विजयी सिलसिला कायम राखला. कोलकाताला पराभूत करत त्यांनी यंदाच्या हंगामातील विजयाची हॅट्ट्रिक नोंदवली.
या सामन्यासाठी बंगलोरने अंतिम अकराच्या संघात एक धाडसी बदल केला होता. केवळ तीन परदेशी खेळाडूंसह ते या सामन्यात उतरले होते. त्यामुळे अनुभवी डॅनियल ख्रिस्टियनला वगळून रजत पट्टीदारला संघात संधी देण्यात आली होती. मात्र संघातून वगळले असले तरी त्याने फिल्डिंग मध्ये अप्रतिम योगदान देत संघाला विजयासाठी मदत केली.
शुभमन गिलचा घेतला लाजवाब कॅच
बंगलोरच्या संघाने पहिल्या डावात ग्लेन मॅक्सवेल आणि एबी डिव्हिलियर्सच्या अर्धशतकांच्या जोरावर २० षटकांत २०४ धावांचा डोंगर उभारला. विजयासाठी २०५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करतांना कोलकाताने चांगली सुरुवात केली होती. विशेषतः कोलकाताचा सलामीवीर शुभमन गिलने ९ चेंडूत २१ धावा काढत मोठ्या खेळीकडे वाटचाल सुरू केली होती.
मात्र दुसर्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर त्याची ही खेळी संपुष्टात आली. कायले जेमिसनच्या गोलंदाजीवर तो ग्लेन मॅक्सवेलच्या जागी बदली फिल्डर म्हणून आलेल्या डॅनियल ख्रिस्टियनच्या हाती कॅच देऊन बाद झाला. ख्रिस्टियनने अप्रतिम डाईव्ह मारत ही कॅच पकडली. त्यामुळे संघात नसून देखील संघासाठी महत्त्वपूर्ण योगदान त्याने दिले.
C.A.T.C.H! 👌👌
Dan Christian has taken an absolute stunner. 🙌🙌
Kyle Jamieson strikes for @RCBTweets as Shubman Gill departs. #VIVOIPL #RCBvKKR
Follow the match 👉 https://t.co/sgj6gqp6tS pic.twitter.com/38jHfj2nMp
— IndianPremierLeague (@IPL) April 18, 2021
दरम्यान, गोलंदाजांच्या शिस्तबद्ध माऱ्यामुळे बंगलोरने सहज विजय साकारला. बंगलोरने नियमितपणे कोलकाताच्या फलंदाजांना बाद केले. त्यामुळे निर्धारित २० षटकांत कोलकात्याने केवळ ८ बाद १६६ धावा केल्या. यासह बंगलोरने ३८ धावांनी विजय मिळवत पॉईंट्स टेबल मध्ये देखील अव्वल स्थान गाठले.
महत्त्वाच्या बातम्या –
“मॉर्गनच्या जागी भारतीय कर्णधार असता तर…”, गौतम गंभीरची संतप्त प्रतिक्रिया