पाकिस्तानचा माजी खेळाडू दानिश कनेरिया नेहमीच आपल्या वक्तव्यावरून चर्चेचा विषय ठरत असतो. आता तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याने बीसीसीआय आणि सूर्यकुमार यादव यांचे उदाहरण देत त्याने पीसीबीवर टीका केली आहे. कनेरियाने म्हटले आहे की, पाकिस्तान आपल्या खेळाडूंना गमावत आहे. आणि बोर्डही यावर कोणतेच ठोस पाऊल उचलत नाही.
बीसीसीआयबद्दल बोलताना तो म्हणाला, सूर्यकुमारसारख्या खेळाडूला बीसीसीआय कधीही जाऊ देणार नाही.
खरं तर नुकतेच पाकिस्तानचा सलामी फलंदाज समी अस्लमने घोषणा केली होती की, तो आता आपली पुढची क्रिकेट कारकीर्द अमेरिकेत घालवणार आहे. अस्लमने पाकिस्तानकडून १३ कसोटी आणि ४ वनडे सामने खेळले होते. कनेरियाने आपल्या यूट्यूब चॅनेलवर बोलताना अस्लमचे उदाहरण देत पीसीबीवर हल्ला चढविला.
त्याने म्हटले की, “अस्लम एक चांगला खेळाडू होता. त्याच्यावर अन्याय झाला आहे. त्याला कधीच त्याप्रकारची संधी मिळाली नाही, ज्याप्रकारची संधी शान मसूद, इमाम उल हक यांसारख्या खेळाडूंना मिळाली होती.”
“हे खूप दुर्देवी आहे. पीसीबी अशाप्रकारे व्यवहार करते की, खेळाडूंना आपले घर सोडण्याची गरज पडते. भारताच्या सूर्यकुमार यादवला न्यूझीलंडकडून खेळण्यासाठी स्कॉट स्टायरिसकडून प्रस्ताव मिळाला होता. परंतु त्याची फ्रँचायझी त्याच्यासोबत उभी आहे. बीसीसीआय त्याच्यासोबत उभी आहे. त्यामुळे तो भारत सोडत नाही,” असेही तो सूर्यकुमार यादवचे उदारहण देताना म्हणाला.
कनेरियाने आपला व्हिडिओ ट्वीट करत लिहिले की, त्यालाही दोन देशांकडून खेळण्याची ऑफर मिळाली होती. परंतु तो गेला नाही. तो म्हणाला, “मागे वळून पाहिले, तर वाटते की, मलाही दुसऱ्या देशात जायला पाहिजे होते. कमीत कमी त्यांच्या क्रिकेट बोर्डाने तरी माझे समर्थन केले असते.”
Sami Aslam left Pakistan will play for USA,during my playing days I was offered by 2 countries but I still went on playing for Pakistan and now this I deserve,should have taken the opportunity watch full video https://t.co/bHi4niugeD
— Danish Kaneria (@DanishKaneria61) December 5, 2020
मॅच फिक्सिंगमध्ये नाव आल्यानंतर दानिशवर पीसीबीने बंदी घातली होती. त्यानंतर त्याला कधीच पुनरागमन करता आले नाही. कनेरिया लगातार पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला पत्र लिहिले आहे की, त्याला क्रिकेट खेळायचे आहे. परंतु पीसीबीने त्याच्या मागणीवर कधीच विचार केला नाही.
महत्त्वाच्या बातम्या-
“नटराजन ‘या’ मालिकेतील सर्वात यशस्वी गोलंदाज”, माजी दिग्गजाने उधळली स्तुतीसुमने
रडणाऱ्या मुलाला वडील दाखवत होते भारत- ऑस्ट्रेलिया सामना, पाहा गमतीशीर व्हिडिओ
भारत- ऑस्ट्रेलिया सराव सामना: दुसऱ्या डावात भारताची सुरुवात खराब, पुजारा शून्यावर बाद, तर रहाणे…
ट्रेंडिंग लेख-
टॉप ३: २०२० मध्ये वनडेत सर्वोच्च वैयक्तिक खेळी करणारे भारतीय शिलेदार; अव्वलस्थानी ‘हा’ खेळाडू
भारताकडून २०२० मध्ये वनडे सामन्यात सर्वाधिक षटकार मारणारे ३ खेळाडू; पंड्या ‘या’ क्रमांकावर
आयपीएलमध्ये अवघ्या ६३ चेंडूत १२० धावा फटकावणारा पॉल वॉल्थटी आता आहे तरी कुठे?