श्रीलंका संघाचा अष्टपैलू खेळाडू दानुष्का गुणथिलका मागच्या काही दिवसांपासून ऑस्ट्रेलियामध्ये पोलीस कोठडीत आहे. गुरुवारी (17 नोव्हेंबर) अखेर त्याला जामीन मंजूर झाला आहे. मागच्या काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियात एका महिलेने त्याच्या लैगिक शोषणाचे आरोप केले होते. त्याला अटक झाल्यानंतर श्रीलंका क्रिकेट बोर्ड त्याची आर्थिक परिस्थिती कमजोर असल्यामुळे मदतीसाठी पुढे आले होते. श्रीलंकन क्रिकेट बोर्डाने कायदेशीर कारवाईसाठी येणारा खर्च उचलल्यानंतर दानुष्का गुणथिलकाला जामीन मिळणे शक्य झाल्याचेही सांगितले जात आहे.
दरम्यान, दानुष्का गुणथिलका (Danushka Gunathilaka) याला जामीन देण्यासाठी 1,50,000 डॉलर्स म्हणजेच जवळपास एक कोटी 20 लाख रुपयांची मागणी केली गेली आहे. जायनिंग सेंटरच्या स्थानिक न्यायालयात गुणथिलका जाणीन मंजूर झाला आहे. माहितीनुसार गुणथिलकाच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात देखील जामिनासाठी याचिका दाखल केली आहे. 8 डिसेंबर रोजी सर्वोच्च न्यायाल या जामीन याचिकेवर सुनावणी करेल.
6 नोव्हेंबर रोजी झाली होती अटक –
तत्पूर्वी 6 नोव्हेंबर रोजी ससेक्स स्ट्रीटवर दानुष्का गुणथिलकाला हयात रिजेंसी या हॉटेलमधून अटक करण्यात आली होती. सिडनीमध्ये राहणाऱ्या एका 29 वर्षीय महिलेचे लैगिंक शोषण केल्याचा आरोप त्याच्यावर झाला होता. या महिलेने दिलेल्या माहितीनुसार गुणथिलकाशी तिची ओळख डेटिंग ऍप टिंडरवर झाली होती. त्यानंतर काही दिवसामध्येच क्रिकेपटूने तिचे लैंगिक शोषण केल्याचे तिने सांगितले होते. अशात 11 दिवस कोठडीत घालवल्यानंतर मात्र त्याला जामिन मंजूर झाला आहे.
क्रिकेट बोर्डाकडून मिळाली मदत –
दानुष्का गुणथिलकावर हे आरोप झाल्यानंतर वातावरण चांगलेच तापले होते. अशात श्रीलंका क्रिकेट बोर्ड देखील सक्रिय झाले आणि त्यांनी क्रिकेटपटूला क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमधून निलंबित केले. असे असले तरी, गुणथिलका या प्रकरणात तेव्हा अडकला जेव्हा श्रीलंका संघ टी-20 विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियात होता. म्हणजेच गुणथिलका त्यावेळी राष्ट्राच्या सेवेत होता. अशात क्रिकेट बोर्डाने त्याचा कायदेशीत खर्च उचलण्याचा निर्णय घेतला. बोर्ड आणि सरकारकडून मिळालेले समर्थन गुणथिलकाच्या सुटकेचे महत्वाचे कारण असल्याचेही सांगितले जात आहे.
असे असले तरी, न्यायालयाने घातलेल्या काही अटी मान्य केल्यानंतर गुणथिलकाला हा जामीन मंजूर केला गेला आहे. असात त्याला या सर्व अटींचे काटेकोर पालण करणे बंधनकारण असणार आहे. गुणथिलका आता त्याच्यावर हे सर्व आरोप करणाऱ्या महिलेशी संपर्क साधू शकणार नाहीये. तसेच टिंडर आणि त्याप्रकारच्या इतर कोणत्याच डेटिंग ऍपचा वापर देखील करू शकणार नाहीये. न्यायालयाने या अटी समोर ठेवूनन जामीन मंजूर केला आहे. (Danushka Gunathilaka granted bail)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
AUS vs ENG | षटकार रोखण्यासाठी एश्टन एगरचा प्रयत्न यशस्वी, व्हिडिओ तुफान व्हायरल
‘प्रशिक्षकांना विश्रांतीची काय गरज?’; रवी शास्त्रींनी टोचले सपोर्ट स्टाफचे कान