मुंबई । डॉम सिब्लीने वेस्ट इंडिज विरुद्धच्या दुसर्या कसोटी सामन्यातील पहिला डावात 120 धावांची खेळी करून सामना जिंकून देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. इंग्लंड क्रिकेट संघाचा माजी वेगवान गोलंदाज डॅरेन गॉफ यांनी डॉम सिब्लीविषयी मोठे विधान केले आहे.
तो म्हणाला की, ‘हा इंग्लिश सलामीवीर (डॉम सिब्ली) भारताचा दिग्गज फिरकीपटू आर अश्विनविरूद्ध खेळत असताना दुहेरी शतक ठोकण्यात यशस्वी ठरला आहे. आता तो जगातील कोणत्याही फिरकी गोलंदाजाचा सामना करु शकेल.’
गॉफ स्काय स्पोर्ट्सशी बोलताना म्हणाले, ”लोक मला सांगत की तो फिरकीविरूद्ध खेळू शकत नाही. मी याआधी ही सांगितले की अश्विन आत्ता सर्वोत्तम फिरकीपटूंपैकी एक आहे. त्याने त्याच्या विरुद्ध खेळताना दुहेरी शतक झळकावले आहे. मैदानाच्या प्रत्येक बाजूला फटके मारले आहेत. अश्विनविरूद्ध खेळताना तो दुहेरी शतक ठोकू शकला, तर ते माझ्यासाठी पुरेसे आहे.”
काउंटी क्रिकेटमध्ये वॉर्कशायरकडून खेळत सिब्लीने नॉटिंगहॅमशायरविरुद्ध नाबाद 215 धावा केल्या होत्या. अश्विन देखील नॉटिंगहॅमशायर संघात होता. इंग्लंडकडून 58 कसोटी सामन्यांत 229 बळी घेणाऱ्या गॉफचा असा विश्वास आहे की सिब्लीकडे दीर्घ खेळी खेळण्याची क्षमता आहे. तो माजी खेळाडू मायकेल अॅथर्टन आणि अॅलिस्टर कुक यांच्यासारखे खेळतो. जेथे तो अव्वल फळीत प्रभावी ठरू शकेल.
“तो खेळाडू मला आवडतो, तो बाद होऊ नये असे वाटते. आम्ही अशा फलंदाजाचा शोध घेत होतो. जे वरच्या क्रमवारीत अॅथर्टन किंवा कुक सारख्या खेळाडूसारखी फलंदाजी करू शकतो. सिब्लीने हे सिद्ध केले आहे की तो वरच्या क्रमांकावर खेळून खेळपट्टीवर वेळ घालवू शकतो. आमच्याकडे असे अनेक खेळाडू आहेत जे धावगती वाढवू शकतात. आम्हाला अशा फलंदाजांची आवश्यकता आहे जे नवीन चेंडूची चमक कमी करू शकतील,” असे गॉफने सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या-
आता धोनीच्या खांद्यावर दिसणार नाही झिवा, पहा काय केलाय क्रिकेटरसाठी नवा नियम
पाकिस्तानला एकेवेळी रडवणार क्रिकेटर झाला हिरो, करतोय तामिळ चित्रपटात पोलीसाचा रोल
रैना- धोनीमध्ये कर्णधार विराट कोहली या खेळाडूला देणार नाही टीम इंडियात संधी
ट्रेंडिंग लेख-
गेल्या १० वर्षात वनडे क्रिकेटमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणारे ५ अष्टपैलू खेळाडू….
६ युवा खेळाडू जे यावर्षी २०२० आयपीएलमध्ये करू शकतात पदार्पण…
सर्वाधिक सलग कसोटी सामने खेळणारे ३ दिग्गज भारतीय क्रिकेटपटू