Loading...

टीम इंडियाच्या गोलंदाजी प्रशिक्षकासाठी ही ७ नावे झाली शॉर्टलिस्ट

शुक्रवारी(16 ऑगस्ट) बीसीसीआयच्या सल्लागार समीतीने रवी शास्त्री यांची भारताच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड केली आहे. आता भारतीय संघासाठी अन्य सपोर्ट स्टाफची निवड एमएसके प्रसाद अध्यक्ष असलेली निवड समीती करणार आहे.

या निवड समीतीने भारतीय संघाच्या गोलंदाजी प्रशिक्षकासाठी 7 जणांची अंतिम उमेदवार म्हणून निवड केली आहे. या उमेदवारांमध्ये इंग्लंडचे माजी वेगवान गोलंदाज डॅरेन गॉफ, स्टिफन जोन्स, तसेच भारताचे सुब्रतो बॅनर्जी, अमित भंडारी, पारस म्हांब्रे, वेंकटेश प्रसाद आणि सुनील जोशी यांचा समावेश आहे.

तसेच सध्याचे भारतीय संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक भारत अरुण मुलाखतीसाठी थेट पात्र आहेत. या सर्व उमेदवारांच्या मुलाखती 19 ऑगस्टला होणार आहेत. या मुलाखतीवेळी सर्व उमेदवारांना त्यांचे प्रेसेंटेशन 20 मिनिटापेक्षा जास्तीचे द्यावे लागणार आहे.

या मुलाखतीनंतर गोलंदाजी प्रशिक्षकाची निवड केली जाणार आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

व्हिडिओ: ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का, अर्धशतक करणारा स्मिथ आर्चरचा चेंडू लागल्याने मैदानाबाहेर

Loading...

रविंद्र जडेजासह १९ खेळाडूंची झाली अर्जून पुरस्कारासाठी निवड, दीपा मलिक, बजरंग पुनियाला खेलरत्न

व्हिडिओ: स्टिव्ह स्मिथचा हा ‘मनोरंजक’ फलंदाजीचा व्हिडिओ होतोय जोरदार व्हायरल

You might also like
Loading...