Loading...

व्हिडिओ: ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का, अर्धशतक करणारा स्मिथ आर्चरचा चेंडू लागल्याने मैदानाबाहेर

लंडन। लॉर्ड्स मैदानावर सध्या इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात ऍशेस मालिकेतील दुसरा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्याच्या चौथ्या दिवशी आज(17 ऑगस्ट) ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्टिव्ह स्मिथला फलंदाजी करत असताना इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरचा चेंडू मानेच्या जवळ लागला. त्यामुळे स्मिथला रिटायर्ड हर्ट होऊन मैदानाबाहेर जावे लागले आहे.

झाले असे की आज दुसऱ्या सत्रात ऑस्ट्रेलियाकडून पहिल्या डावात स्मिथ 152 चेंडूत 80 धावांवर फलंदाजी करत असताना 77 व्या षटकातील दुसरा चेंडू आर्चरने बाऊंसर टाकला. हा चेंडू स्मिथच्या हेल्मेटच्या उजव्या बाजूला त्याच्या मानेच्या जवळ लागला. त्यामुळे स्मिथ वेदनेने मैदानावरच कोसळला.

त्यानंतर दोन्ही संघाच्या वैद्यकीय टीम मैदानावर आल्या. पण अखेर स्मिथला रिटायर्ड हर्ट होऊन परत ड्रेसिंग रुममध्ये परतावे लागले. तो परत जात असताना मैदानावरील प्रेक्षकांनी टाळ्या वाजवत स्मिथच्या फलंदाजीचे कौतुक केले.

या सामन्यात पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाची आवस्था 2 बाद 60 अशी असताना स्मिथ फलंदाजीला आला होता. पण त्यानंतर ऑस्ट्रेलियाने पुढील 3 विकेट्स नियमित कालांतराने गमावल्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियाची आवस्था 5 बाद 102 धावा अशी झाली होती.

पण नंतर स्मिथने कर्णधार टीम पेनला साथीला घेत 6 व्या विकेटसाठी 60 धावांची भागीदारी रचली. पण पेन 24 धावा करुन बाद झाला. यानंतर स्मिथने पॅट कमिन्सला साथीला घेतले. पण त्यांची 41 धावांची भागीदारी झाली असतानाच स्मिथला दुखापतग्रस्त होऊन ड्रेसिंगरुममध्ये परतावे लागले.

Loading...

स्मिथने या सामन्यात शानदार फलंदाजी केली आहे. त्याने ऍशेसमध्ये सलग सातव्या डावात 50 किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी केली आहे. त्यामुळे तो अशी कामगिरी करणारा पहिला फलंदाज ठरला आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

रविंद्र जडेजासह १९ खेळाडूंची झाली अर्जून पुरस्कारासाठी निवड, दीपा मलिक, बजरंग पुनियाला खेलरत्न

व्हिडिओ: स्टिव्ह स्मिथचा हा ‘मनोरंजक’ फलंदाजीचा व्हिडिओ होतोय जोरदार व्हायरल

Loading...

संदीप नरवाल प्रो कबड्डीमध्ये अशी कामगिरी करणारा केवळ दुसराच खेळाडू

You might also like
Loading...