---Advertisement---

डॅरेल मिशेलनं सरावादरम्यान फोडला चाहत्याचा फोन, मग अशी केली भरपाई; पाहा व्हायरल VIDEO

---Advertisement---

चेन्नई सुपर किंग्जचा फलंदाज डॅरेल मिशेलचा एक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ पंजाब किंग्ज आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात धर्मशाला येथे झालेल्या सामन्यापूर्वीचा आहे.

झालं असं की, सराव सत्रादरम्यान डॅरेल मिशेलनं मारलेला एक चेंडू तिथे उपस्थित असलेल्या एका चाहत्याला लागला. चेंडू आदळल्यानं त्या चाहत्याच्या हातातील मोबाईल पडून फुटला. यानंतर डॅरेल मिशेलनं त्याला एक खास भेट दिली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे. युजर्स मिशेलच्या औदार्याचं कौतुक करत आहेत.

व्हिडिओमध्ये दिसत आहे की, डॅरेल मिशेल नेटजवळ पुल शॉट्सचा सराव करत होता. त्याचे काही शॉट्स नेटवर आदळले. दरम्यान, मिशेलच्या बॅटमधून निघालेला एक चेंडू नेटवरून गेला आणि तिथे उपस्थित असलेल्या एका चाहत्याच्या हातावर आदळला. हा दर्शक आयफोननं मिशेलचा व्हिडिओ बनवत होता. मात्र चेंडू लागल्यानं त्याचा मोबाईल फुटतो आणि तो थोडा जखमीही होतो.

डॅरेल मिशेलच्या हे लक्षात येताच त्यानं सर्वप्रथम या चाहत्याची माफी मागितली. परिस्थिती समजून घेत न्यूझीलंडचा हा फलंदाज या व्यक्तीजवळ पोहोचतो आणि त्याला मोबाईलच्या बदल्यात आपल्या बॅटिंग ग्लोव्हजची जोडी भेट देतो. इतर उपस्थित चाहत्यांनी या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर पोस्ट केला. यावर आता भरभरून कमेंट येत आहेत. चाहते डॅरेल मिशेलच्या उदारपणाचं खूप कौतुक करत आहेत.

 

या सामन्यात मिचेलनं 19 चेंडूत 30 धावांची शानदार खेळी खेळली. या दरम्यान त्यानं दोन चौकार आणि एक उत्तुंग षटकारही लगावला. त्याच्या योगदानाच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्जनं 9 विकेट्स गमावून 167 धावा केल्या. प्रत्युत्तरात, धावांचा पाठलाग करताना पंजाब किंग्जचा संघ केवळ 139 धावाच करू शकला. अशाप्रकारे चेन्नईनं हा सामना 28 धावांनी जिंकला.

महत्त्वाच्या बातम्या – 

केकेआरच्या खेळाडूंना आलं महादेवाचं बोलावणं, विमान कोलकात्याला जाण्याऐवजी वाराणसीला पोहचलं!

निवृत्तीनंतर भारतात स्थायिक होणार का? डेव्हिड वॉर्नर म्हणाला, “मी इथे घर…”

आयपीएलमध्ये फाटलेल्या स्नायूंनी खेळतोय महेंद्रसिंह धोनी! डॉक्टरांनी दिल्या विश्रांतीच्या सक्त सूचना

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---