भारत विरुद्ध न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका झाली. या मालिकेतील पहिला कसोटी सामना अनिर्णीत राहिला होता, तर दुसरा कसोटी सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर भारतीय संघाने ३७२ धावांनी जिंकला. भारताने दिलेल्या ५४० धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडला केवळ १६७ धावाच करता आल्या. असे असले तरी सामन्याच्याच्या तिसऱ्या दिवशी डॅरील मिशेलने न्यूझीलंड संघाला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी अर्धशतकी खेळी केली होती. दरम्यान, या खेळी नंतर त्याने एक मोठा खुलासा केला.
भारतीय संघातील फलंदाजांनी आणि गोलंदाजांनी या सामन्यात अप्रतिम कामगिरी केली आहे. भारतीय संघाकडून डावाची सुरुवात करण्यासाठी आलेल्या मयांक अगरवालने पहिल्या डावात शतक, तर दुसऱ्या डावात अर्धशतक झळकावले होते. त्याने न्यूझीलंड संघातील गोलंदाजांना अडचणीत टाकले होते.
दुसरीकडे न्यूझीलंड संघातील फलंदाज डॅरील मिशेलने देखील भारतीय गोलंदाजांचा योग्यरीत्या सामना करत अर्धशतक झळकावले. दरम्यान सामना झाल्यानंतर त्याने खुलासा करत म्हटले की, भारतीय फिरकी गोलंदाजांचा सामना करण्यासाठी त्याने मयांक अगरवालकडून धडा घेतला आहे.
डॅरिल मिशेलने तिसऱ्या दिवसाचा (५ डिसेंबर) खेळ संपल्यानंतर म्हटले की, “मी मयांक अगरवालच्या फलंदाजीवरून धडा घेतला आहे. त्याने ज्याप्रकारे आमच्या फिरकी गोलंदाजांवर दबाव आणला, तसच काहीसं मी देखील करण्याचा प्रयत्न केला. मी खेळपट्टीवर टिकून राहू शकलो नाही, हे निराशाजनक आहे. परंतु, भागीदारी करणे समाधानकारक होते.”
तसेच तो पुढे म्हणाला की, “ते (भारतीय गोलंदाज) सतत तुमच्यावर दबाव आणत असतात आणि तुम्ही प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न करत असतात. संघर्ष करून विजय मिळवण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे. ही आव्हान देणारी खेळपट्टी आहे. निश्चितच चेंडू खूप जास्त फिरकी घेत आहे. कुठल्याही चेंडूवर फलंदाज बाद होऊ शकतो.”
मिशेल तिसऱ्या दिवशी ६० धावांवर अक्षर पटेलविरुद्ध खेळताना बाद झाला होता. चौथ्या दिवशी न्यूझीलंडला विजयासाठी ४०० धावांची गरज होती आणि ५ विकेट्स हाती होत्या. मात्र, या उर्वरित उर्वरित पाचही विकेट्स दिवसाच्या पहिल्या तासातच न्यूझीलंडने गमावल्या. त्यामुळे भारताने सव्वातीन दिवसात सामना आपल्या नावावर केला.
महत्त्वाच्या बातम्या –
‘विराटसने’चा वानखेडेवर पराक्रम! न्यूझीलंडचा ३७२ धावांनी पराभव करत ‘या’ यादीत गाठले अव्वल स्थान
मायभूमीवर २०१३ पासून टीम इंडिया अजेय! ‘या’ संघांना भारतभूमीत पाजले पराभवाचे पाणी
ऋतुराज गायकवाडला कर्णधारपद! भारतातील ‘या’ मोठ्या स्पर्धेत करणार महाराष्ट्राचे नेतृत्त्व