---Advertisement---

भन्नाटच! न्यूझीलंडच्या क्रिकेटपटूने घेतला अचंबित करणारा एकहाती झेल; व्हिडिओ व्हायरल

On: बुधवार, डिसेंबर 23, 2020 7:06 AM
---Advertisement---

न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यातील तीन सामन्यांची टी२० मालिका २-१ अशा फरकाने न्यूझीलंडने आपल्या नावे केली. मंगळवारी (२२ डिसेंबर) झालेल्या मालिकेतील तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात पाकिस्तानने यजमान न्यूझीलंडचा ४ गडी राखून पराभव केला. मात्र, मालिकेतील पहिले दोन सामने जिंकलेल्या न्यूझीलंडला मालिका विजयाचा बहुमान मिळाला. तिसरा सामना पाकिस्तानने आपल्या नावे केला असला तरी, न्यूझीलंडचा खेळाडू डॅरेल मिशेल याने एक अफलातून झेल पकडत सर्वांची शाबासकी मिळवली.

न्यूझीलंडने उभारली सन्मानजनक धावसंख्या

नेपियर येथील मॅकलीन पार्क येथे झालेल्या तिसऱ्या सामन्यात यजमान न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात १७३ धावा फलकावर लावल्या होत्या. न्यूझीलंडकडून मधल्या फळीतील फलंदाज डेवॉन कॉनवे याने सर्वाधिक ६३ धावांचे योगदान दिले. तर टीम सिफर्ट व ग्लेन फिलिप्स यांनी अनुक्रमे ३५ व ३१ धावा केल्या. पाकिस्तानकडून फहीम अश्रफने तीन बळी आपल्या नावे केले.

मिशेलचा लाजवाब झेल

न्यूझीलंडने दिलेल्या १७४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मोहम्मद रिजवान व हैदर अली यांनी पाकिस्तानला दमदार सलामी दिली. दोघांनी पहिल्या पाच षटकात ४० धावा फलकावर लावल्या होत्या. त्याच वेळी सहावे षटक टाकण्यासाठी वेगवान गोलंदाज स्कॉट कुगलीन मैदानात आला. त्याच्या दुसऱ्याच चेंडूवर हैदर अलीच्या बॅटला लागून चेंडूवर उडाला. मार्टिन गप्टिलच्या जागी क्षेत्ररक्षणासाठी आलेल्या डॅरेल मिशेलने उजवीकडे झेपावत एका हातात अप्रतिम झेल पकडला.

मिशेलच्या या झेलानंतर संघ सहकाऱ्यांनी त्याचे कौतुक केले. टीम साऊदीने त्याच्या डोक्यावर मारत अनोख्या पद्धतीने त्याला शाबासकी दिली. मिचेलने घेतलेल्या या झेलाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावरही चांगलाच व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे या सामन्यात मिशेलने ३ झेल घेतले.

https://twitter.com/sparknzsport/status/1341300721505845248

पाकिस्तानने मिळवला विजय

मिशेलच्या झेलाव्यतिरिक्त न्यूझीलंडसाठी या सामन्यात आणखी काही खास घडले नाही. यष्टीरक्षक सलामीवीर मोहम्मद रिजवानने ५९ चेंडूत ८९ धावा करत पाकिस्तानला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका निभावली. अनुभवी मोहम्मद हफिजने देखील ४१ धावांचे योगदान दिले. पाकिस्तानला या सामन्यात विजय मिळाला असला तरी, मालिका न्यूझीलंडच्या नावे राहिली.

उभय संघांमध्ये २६ डिसेंबरपासून दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाईल. पाकिस्तानचा नियमित कर्णधार बाबर आझम आणि अनुभवी सलामीवीर इमाम उल हक दुखापतीमुळे या सामन्यात खेळणार नाहीत. यावेळी पाकिस्तानचे नेतृत्व यष्टीरक्षक मोहम्मद रिजवान करेल.

महत्त्वाच्या बातम्या –

जामीनानंतर रैनाने दिले अटकेबाबत स्पष्टीकरण; सांगितली संपूर्ण घटना

बाबो!! चक्क मैदानावर प्रतिस्पर्ध्याच्या तोंडावर थुंकला ‘हा’ खेळाडू, झाली मोठी कारवाई; पाहा व्हिडिओ

शुभमंगल सावधान! फिरकीपटू युझवेंद्र चहलची विकेट पडली, धनश्री वर्मासोबत बांधली लगीनगाठ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---