भारत विरुद्ध श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये गुरुवारी (२९ जुलै) टी-२० मालिकेतील अंतिम आणि निर्णायक टी-२० सामना खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाला विजयाचे प्रबळ दावेदार मानले जात होते. परंतु श्रीलंका संघातील गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांना नांग्या टाकण्यास भाग पाडले. या सामन्यात ७ गडी राखून विजय मिळवत श्रीलंका संघाने ही मालिका २-१ ने आपल्या नावावर केली आहे. हा सामना झाल्यानंतर श्रीलंकन कर्णधाराने भारतीय कर्णधार आणि प्रशिक्षकांचे आभार मानले आहेत.(Dasun shanaka says thanks to rahul Dravid and shikhar dhawan after winning T20 series)
भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना दिलेले ८२ धावांचे आव्हान श्रीलंका संघाने १४.३ षटकात पूर्ण केले होते. या सामन्यानंतर झालेल्या मुलाखतीत श्रीलंकेचा कर्णधार दासून शनाका म्हणाला की, “मला बीसीसीआयचे आभार मानायचे आहेत. अशा कठीण परिस्थितीत देखील त्यांनी खेळण्यासाठी होकार दिला. मुख्यतः शिखर धवन आणि राहुल द्रविड यांचा मानतो. ही गेल्या काही वर्षातील आमची सर्वोत्कृष्ट गोलंदाजी होती. माझ्याकडे गोलंदाजांचे पर्याय उपलब्ध होते. मी त्यांचा योग्य वापर केला.”
“फक्त मीच नव्हे जर सर्व खेळाडूंनी खूप मेहनत केली आहे. ते जिंकण्यासाठी आणि विश्वस्तरीय खेळाडू बनण्यासाठी खूप उत्सुक होते. चमिराने ज्याप्रकारे सुरुवात करून दिली, वानिंदूने गोलंदाजी केली. करूनारत्नेही श्रीलंका क्रिकेटसाठी एक रत्न आहे. सर्व खेळाडूंनी खूप मेहनत घेतली आहे. सर्व खेळाडूंनी परिस्थिती जाणून घेतली आणि आपल्या डोक्याचा योग्य वापर केला. मी भाग्यशाली आहे की, मला या संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली. जेव्हा विरोधी संघ कमी धावांचे आव्हान देतो तेव्हा सकारात्मक सुरुवात मिळणे गरजेचे असते. परंतु हे युवा खेळाडू आहेत जे शिकत आहेत. भविष्यात याचा त्यांना नक्कीच फायदा होईल,” असेही त्याने म्हटले.
श्रीलंका संघाचा ७ गडी राखून विजय
तसेच सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु हा निर्णय पूर्णपणे फसला. कुलदीप यादवच्या २३ धावा वगळता एकाही फलंदाजाला मोठी खेळी साकारता आली नाही. २० षटक अखेर भारतीय संघाला ८ बाद ८१ धावा करण्यात यश आले होते. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या श्रीलंका संघाने हे आव्हान ७ गडी आणि ३० चेंडू शिल्लक ठेऊन पूर्ण केले. यासह ही मालिका २-१ ने आपल्या नावावर केली.
महत्त्वाच्या बातम्या-
पडीक्कलचा चौकार अडवण्यासाठी श्रीलंकेचे तब्बल ४ खेळाडू धावले चेंडूमागे, Video पाहून व्हाल लोटपोट
विरोधकांना चोप देत ‘या’ संघांनी वनडेत सर्वाधिक वेळा उभारल्यात ४०० धावा, भारत दुसऱ्यास्थानी
दारुण पराभवानंतर खरीखोटी न ऐकवता कर्णधार धवनकडून खेळाडूंची तोंडभरुन स्तुती, वाचा काय म्हणाला






