---Advertisement---

भारताविरुद्धच्या टी२० मालिकेपुर्वी श्रीलंका संघ बदलणार संघनायक! ‘हा’ अष्टपैलू प्रबळ दावेदार

On: गुरूवार, जुलै 8, 2021 2:17 PM
---Advertisement---

भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये येत्या काही दिवसांत मर्यादित षटकांची मालिका रंगणार आहे. यामध्ये ३ वनडे आणि ३ टी-२० सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर श्रीलंकन संघात मोठा बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

असा अंदाज व्यक्त केला जात आहे की, भारतीय संघाविरुद्ध होणाऱ्या टी-२० मालिकेपूर्वी श्रीलंकन क्रिकेट बोर्ड नवीन कर्णधाराची घोषणा करू शकतात. कारण कुसल परेराला संघाचे नेतृत्व करत असताना साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले आहे.

माध्यमातील वृत्तांनुसार, भारतीय संघाविरुद्ध होणाऱ्या टी-२० मालिकेत श्रीलंकन संघाचे नेतृत्वपद दसून शनाकाला देण्यात येऊ शकते. यामागील कारण असे की, शनाका सध्या संघातील सर्वात अनुभवी आणि वरिष्ठ खेळाडूंपैकी एक आहे. तसेच येत्या काही दिवसात श्रीलंकन क्रिकेट बोर्ड याची अधिकृतरित्या घोषणा करू शकते. कारण येत्या २१ जूनला भारतीय संघाविरुद्ध टी-२० मालिकेला प्रारंभ होणार आहे. त्यापूर्वी वनडे आणि टी२० संघाची घोषणा केली जाणार आहे. (Dasun shanaka set to replace kusal Perera as the new t20i captain of srilanka)

दसून शनाकाने आतापर्यंत श्रीलंकन संघासाठी एकूण ४२ टी-२० सामने खेळले आहेत. या सामन्यांमध्ये त्याने अवघ्या १६.१२ च्या सरासरीने ५४८ धावा केल्या आहेत. यामध्ये ५४ धावा ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे. त्याला अवघ्या २ वेळेस ५० धावांचा आकडा पार करण्यास यश आले आहे. दसून शनाकाने फलंदाजीमध्ये साजेशी कामगिरी केली नसली तरी गोलंदाजी करताना त्याने ४२ सामन्यात ११ गडी बाद केले आहेत. त्यामुळेच जर त्याला कर्णधाराची भूमिका दिली गेली, तर तो आणखी चांगली कामगिरी करू शकतो.

असे आहे भारत विरुद्ध श्रीलंका मालिकेचे वेळापत्रक
वनडे मालिका
१)पहिला वनडे सामना – १३ जुलै
२) दुसरा वनडे सामना – १६ जुलै
३) तिसरा वनडे सामना – १८ जुलै
टी-२० मालिका
१) पहिला टी – २०सामना – २१ जुलै
२) दुसरा टी-२० सामना – २२ जुलै
३) तिसरा टी -२० सामना – २५ जुलै

असा आहे श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघ

शिखर धवन (कर्णधार), भुवनेश्वर कुमार (उपकर्णधार), पृथ्वी शॉ, देवदत्त पडिक्कल, रुतुराज गायकवाड़, सूर्यकुमार यादव, मनीष पांडे, हार्दिक पंड्या, नीतीश राणा, इशान किशन, संजू सॅमसन, युजवेंद्र चहल, राहुल चाहर, कृष्णप्पा गौतम, क्रुणाल पंड्या, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, दीपक चाहर, नवदीप सैनी आणि चेतन सकारिया.

नेट गोलंदाज :

ईशान पोरेल, संदीप वॉरियर, अर्शदीप सिंग, साई किशोर, सिमरनजीत सिंग

महत्वाच्या बातम्या-

क्रिकेटची खेळपट्टी ते भलीमोठी जिम; ‘कोलकाताच्या प्रिंस’चा ४८ खोल्यांचा ६५ वर्षे जुना राजमहाल पाहिलाय का?

‘धवन’ची आर्मी लंकादहन करण्यासाठी होतेय सज्ज, इंट्रास्क्वॉड सामन्यात दाखवला दम; बघा फोटो

काय सांगता! दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजाने २७८ चेंडूमध्ये केल्या फक्त ३७ धावा; तरीही होतंय कौतुक

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---